शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ओलमण परिसरात तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: March 30, 2016 01:20 IST

रायगड जिल्ह्यात अनेक भागात पाणीटंचाईची समस्या जाणवत असताना आता कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या ओलमण आणि आसपासच्या आदिवासी पाड्यांनाही

- कांता हाबळे,  नेरळरायगड जिल्ह्यात अनेक भागात पाणीटंचाईची समस्या जाणवत असताना आता कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या ओलमण आणि आसपासच्या आदिवासी पाड्यांनाही पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. जवळच्या विहिरी आटल्याने दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून पाणी चढाव चढत आणावे आहे. काही जण तर बैलगाडीने पाणी आणताना दिसत आहेत. त्यामुळे शासनाने लवकरच टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आता ओलमण भागातील ओलमण, पेंढरी, तेलंगवाडी, बोडशेतं, चाहूची वाडी या टंचाईग्रस्त ग्रामस्थांकडून केली जात आहे.कर्जत तालुक्यात शासनाने पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. त्यात ३४ गावे व ४१ वाड्या आहेत. त्यात ओलमण गावाचाही समावेश आहे. मात्र आजूबाजूच्या वाड्यांचा समावेश नाही. परंतु तालुक्यात अद्याप एकाही गावाला शासनाकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यात सुरुवात झाली नाही. ओलमण गावासाठी १९९८ मध्ये एक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. मुरबाड तालुक्यातील पाटगाव हद्दीतील ओहळातून हा पाणीपुरवठा केला जात होता. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना नादुरु स्त आहे. तेव्हापासून पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. ओलमण गावात ८० ते ८५ घरांची वस्ती असून, येथील महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत आहे. तेलंगवाडी, बोंडशेतं, पेंढरी, कळंब ग्रामपंचायत हद्दीतील चाहूची वाडी या आदिवासी वाड्यांमधील महिलांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विहिरी व बंधारे आटल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ओलमण गावापासून एक ते दीड किमी अंतरावरून मोठा चढाव चढत महिलांना पाणी आणावे लागत आहे.कर्जतमध्ये टँकर नाहीशासनाच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा केला जातो. परंतु यात कोणाला पाणी मिळते तर कोणाला मिळत नाही. चांगल्या दर्जाचे पाणी नसल्याने या पाण्याने आजाराचे प्रमाणही वाढते, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. परंतु अद्याप शासनाकडून कर्जत तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा केला जात नसल्याने लवकर सुरु करावा.कर्जत तालुक्याचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला असून, हा प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठविला आहे. आ. सुरेश लाड यांच्या अध्यक्षतेखाली टंचाईसंदर्भात बैठक घेतली होती. यात फक्त ओलमण गावाचाच समावेश आहे. माणसे पाठवूनही वाड्यांचा समावेश या टंचाई आराखड्यात केला नाही. -अशोक थुले, गटविकास अधिकारी प. सं. कर्जत.दरवर्षीप्रमाणे आमच्या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जवळपास असणाऱ्या विहिरी आटल्या असून, महिलांना दीड ते दोन किमी अंतरावरून चढाव चढून पाणी आणावे लागत आहे. या भागातील कायमसाठी पाणीटंचाई सोडविण्यासाठी ओलमण गावालगत पाझर तलाव बांधणे गरजेचे आहे, जेणेकरून कायमचा पाणीप्रश्न सुटेल. - दादा मनोहर पादीर, माजी सरपंच, ओलमण