शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना लागली कर्जफेडीची चिंता

By admin | Updated: May 6, 2015 23:31 IST

कर्जत तालुक्यातील चिल्हार नदीवर लोभेवाडी - पत्र्याची वाडी येथे २०१२ मध्ये बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याला गळती लागली आहे.

राहुल देशमुख, नेरळकर्जत तालुक्यातील चिल्हार नदीवर लोभेवाडी - पत्र्याची वाडी येथे २०१२ मध्ये बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याला गळती लागली आहे. पाणी गळतीमुळे बंधारा कोरडा पडत आहे. परिणामी बंधाऱ्याचे पाणी मिळेल म्हणून केलेली भाजीपाला शेती सुकून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे घेतलेले कर्ज फेडायचे कसे, या चिंतेत शेतकरी आहेत. तीन वर्षांपूर्वी भीमाशंकर डोंगरात उगम पावलेल्या चिल्हार नदीचे पात्र उन्हाळ्यात कोरडे असते. परिणामी नांदगाव खांडसपासून कोलिवलीपर्यंतच्या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. चिल्हार नदीच्या मार्गात असलेल्या गावांना पाण्याचा उगम निर्माण व्हावा, म्हणून राज्य सरकारने पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून नदीमध्ये कोल्हापूर टाईपचे सिमेंट बंधारे बांधण्याचा कार्यक्र म हाती घेतला होता. साधारण ५० मीटर लांबीचा सिमेंट बंधारा जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून पत्र्याची वाडी - लोभेवाडी येथे बांधला होता. कोल्हापूर टाईपचे बंधारे अशा कोरड्या असलेल्या नदीमध्ये पाणी साठवून ठेवण्यात महत्त्वाचे ठरले होते. कारण पत्र्याची वाडीतील अनेक शेतकरी यांनी बंधाऱ्यात अडविलेल्या पाण्याचा वापर भाजीपाला पिकविण्यासाठी करीत होते. किमान १५ शेतकरी या भागात भाजीपाला शेतीचे नियोजन करीत असताना यावर्षी बंधारा पाणी गळतीमुळे कोरडा पडला आहे. एप्रिल महिन्याआधी बंधारा कोरडा पडल्याने भाजीपाला शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.परिणामी भाजीपाला शेतीसाठी प्रसंगी कर्ज काढून शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांवर संकट आले आहे. यावेळी बंधारा लवकर रिकामा होईल, असे माहीत असते तर भाजीपाला शेती केली नसती, असे जैतू सका पारधी या शेतकऱ्याने सांगितले. आता घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न कायम असताना यावर्षी पाणी गळतीची बाब लक्षात आली. आता पाटबंधारे विभागाने त्यावर पावसाळ्याआधी उपाययोजना करावी म्हणजे पुढच्या वर्षी अशी स्थिती पुन्हा भाजीपाला शेतकरी यांच्यावर येणार नाही, अशी अपेक्षा पारधी यांनी व्यक्त केली आहे.