शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी शेतकºयांना एकच नियम लावावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 03:58 IST

राज्य सरकारने शेतकºयांना सरसकट दीड लाखांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काही निकष लावले आहेत; परंतु या कर्जमाफीचा फायदा कोकणातील शेतकºयांना

नेरळ : राज्य सरकारने शेतकºयांना सरसकट दीड लाखांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काही निकष लावले आहेत; परंतु या कर्जमाफीचा फायदा कोकणातील शेतकºयांना विशेषत: रायगड जिल्ह्यातील शेतकºयांना होताना दिसत नाही.जिल्ह्यातील शेतकरी सधन आहेत, असेही नाही; परंतु दर हंगामाला उसनवारी करून घरातील सोने-नाणे गहाण ठेवून किंवा वेळ प्रसंगी जमिनीचा तुकडा विकून, त्यातून शेतकरी कर्जाचे हफ्ते नियमित भरण्याचा प्रयत्न करतो. मात्र, सरकार याच शेतकºयांना फक्त २५ टक्के अनुदान, तर जे शेतकरी कर्जाची परतफेडच करीत नाहीत, त्यांना मात्र दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी करणार असल्याने येथील शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने सर्व शेतकºयांना प्रत्येकी दीड लाख अनुदान द्यावे, अशी मागणी शेकापचे जिल्हाचिटणीस विलास थोरवे यांनी केली आहे.शासनाने जून २०१६पर्यंत कर्ज परतफेड करणाºया शेतकºयाला २५ टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि मात्र ज्या शेतकºयांनी नियमित हफ्ते भरलेच नाहीत, अशा शेतकºयांना मात्र दीड लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यामुळे जो शेतकरी पोटाला चिमटा काढून नियमित कर्जफेडीचे हफ्ते भरतो. तो मात्र शासनाच्या या निकषांमुळे वंचित राहत आहे. त्यामुळे संबंधित शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी पसरून तो निराश झाला आहे.मुळातच कर्जत तालुक्यातील जमीन रिलायन्स, एचपीसीएल यासारख्या कंपन्यांच्या पाइपलाइनसाठी बळजबरीने शेतकºयांकडून संपादित करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी पिचलेला आहे. त्यातच शासनाच्या या दिशाभूल करणाºया या कर्जमाफीच्या निर्णयामुळे शेतकरी अजूनच हवालदिल झाला आहे. शासनाने जर जिल्ह्यातील या शेतकºयांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला नाही, तर या शेतकºयांना भविष्यात शेती करणेही अवघड होईल. तरी शासनाने जिल्ह्यातील नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांच्या खात्यात दीड लाख अनुदान भरावे, अशी मागणी शेकापचे जिल्हाचिटणीस विलास थोरवे यांनी शासनाकडे केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास, आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला आहे, तसेच स्थानिक आमदार सुरेश लाड, आमदार पंडित पाटील, आमदार धैर्यशील पाटील, आमदार बाळाराम पाटील यांनी विधानसभा व विधानसभेत या विरोधात आवाज उठवावा, असे आवाहनही केले आहे.- कर्जमाफीसाठी आॅनलाइन फॉर्म भरणे शेतकºयांना बंधनकारक केले आहे. मात्र, ज्या ठिकाणी ही फॉर्म भरण्याची सेंटर्स आहेत. मात्र, त्या ठिकाणी इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. त्यातच काहींचे आधार कार्ड नसल्यानेही अडथळे येत आहेत.२०१५ -१६, २०१६-१७च्याअगोदर ज्यांनी कर्ज घेऊन परतफेड केली नाही, त्यांना पूर्ण कर्जमाफी तर ज्यांनी २०१५-१६, २०१६-१७पर्यंत कर्ज घेऊन, ३१ जुलै २०१७पर्यंत कर्जाची परतफेड केली आहे, अशा शेतकºयांना मात्र फक्त २५ टक्केच कर्जमाफी (अनुदान) मिळणार आहे आणि ज्यांनी फक्त १५ हजार रु पये कर्ज घेतले आहे, त्यांचे संपूर्ण म्हणजेच १५ हजारांचे कर्ज माफ होणार आहे.- बी. आर. नांदगावकर,कर्जमाफी विभागीय अधिकारी