शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

टॉवरच्या बहाण्याने फसवणूक

By admin | Updated: February 15, 2016 03:04 IST

हल्ली कमी वेळेत जास्त पैसे कमविण्यासाठी अनेक शक्कल लढविल्या जातात आणि कष्ट न करता भरपूर पैसे मिळाले पाहिजेत,

कर्जत : हल्ली कमी वेळेत जास्त पैसे कमविण्यासाठी अनेक शक्कल लढविल्या जातात आणि कष्ट न करता भरपूर पैसे मिळाले पाहिजेत, यासाठी अनेक जण खोट्या जाहिरातींना बळी पडतात. अशीच एक जाहिरात पाहून कर्जतमधील एक व्यक्तीचे एका महिन्यात सुमारे साडेतीन लाख रु पये लुटले आहेत. याबबात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एका वर्तमानपत्रात जानेवारी २०१६ ला गॅलेक्सी टॉवर या कंपनीची ‘छतावर टॉवर लावणे आहे,’ अशी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्या जाहिरातीत काही भ्रमणध्वनी दिले होते. आलेल्या जाहिरातीवरून कर्जतमधील एका व्यक्तीने दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर फोन लावला, त्यावेळी त्याला सांगण्यात आले की तुमच्या जागेत टॉवर बसविला तर आम्ही तुम्हाला ७० लाख रु पये डिपॉझिट व ४५ हजार रुपये महिना भाडे तसेच घरातील एका माणसाला नोकरी देऊ. प्लॉटचा सातबारा उतारा मी एक मेल आयडी करतो, त्यावर पाठवून द्या असे सांगितले. एका महिन्यात एवढे पैसे मिळणार, या विचाराने त्या व्यक्तीने जागेची कागदपत्रे पाठवली. तुमची जागा थ्री-जी व्होडाफोन टॉवर बसविण्याकरिता सिलेक्ट झाली आहे, असे सांगून त्याकरिता रजिस्ट्रेशन फी म्हणून १,५५० रुपये आमच्या वकिलाच्या खात्यात जमा करावे लागतील, असे सांगितले. अशा प्रकारे विविध कारणांनी पैशाची मागणी करून एका महिन्यात त्या व्यक्तीकडून ३,३२,२५० रुपये उकळले आहे. (वार्ताहर)