शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

बनावट मद्याचा साठा जप्त

By admin | Updated: November 22, 2015 00:31 IST

जेएनपीटी बंदरातून विदेशी दारूची चोरटी आयात करणाऱ्या एकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून लाखो रुपयांची विदेशी दारू आणि

चिरनेर : जेएनपीटी बंदरातून विदेशी दारूची चोरटी आयात करणाऱ्या एकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून लाखो रुपयांची विदेशी दारू आणि एक कार जप्त केली आहे. रमेश खिमजी भानुशाली असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला २१ नोहेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पनवेल उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना रमेश भानुशाली हा जेएनपीटीतून विदेशी मद्याची तस्करी करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुरुवारी सापळा रचून त्याला गव्हाणफाटा येथील जावळी गावाजवळील सोनाली वेअर हाऊस येथून स्कोडा गाडीसह अटक केली. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी त्याच्या गाडीच्या डिकीत लपवून ठेवलेल्या बनावट विदेशी दारूच्या (स्क्वॉच) बाटल्या आढळल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून विदेशी मद्याच्या ब्लॅक लेबल-५0 बॉटल्स, जेबी ९ बॉटल्स, टीचर मद्याच्या ४ बॉटल्स; शिवास रिगलच्या ७ , प्लॅटिनम लेबल ३, सेनेरिओ डी लॉस वाइनच्या ९६ आणि ३ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ७ लाख ४६ हजार ६00 रुपयंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील, माणकेश्वर कॉलनी केगाव येथील घराची झडती घेतली असता तिथे विदेशी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य, रिकाम्या बाटल्या आणि बनावट दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत १0 लाख ८८ हजार ३६५ एवढी आहे. उरण परिसरातून एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट विदेशी मद्याचा साठा प्रथमच हस्तगत केला असून, या दारूचा पुरवठा उरण आणि परिसरातल्या वाइन शॉपमध्ये होत असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, नवी मुंबई पोलीस आयुक्त, संचालक आणि उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त यांनी बनावट दारू बनवित असलेल्या उरणजवळील ठिकाणाला भेट दिली आणि पुढील तपासाचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक कणसे हे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)