शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तरतूद नसतानाही वाळू विक्रीला मुदतवाढ

By admin | Updated: October 10, 2016 03:36 IST

सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ पाण्याबाहेर राहिलेली वाळू मातीमध्ये रूपांतर होते. अशी माती झालेली वाळू बांधकाम व्यावसायिक घेत नाहीत.

सिकंदर अनवारे / दासगावसहा महिन्यांपेक्षा अधिक काळ पाण्याबाहेर राहिलेली वाळू मातीमध्ये रूपांतर होते. अशी माती झालेली वाळू बांधकाम व्यावसायिक घेत नाहीत. किंबहुना साठवणुकीच्या या वाळूला बाजारपेठेत किंमत मिळत नाही. असे असताना दोन वर्षांपूर्वी बंद काळात जप्त केलेल्या वाळूचा महाड महसूल प्रशासनाकडून काढलेल्या लिलावावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ठेका संपल्यानंतर कोणत्याही बाबीची तरतूद नसताना हा ठेका घेतलेल्या वाळू व्यावसायिकांना १० दिवस विक्रीसाठी मुदतवाढ करून दिल्याने महसूल विभाग तसेच गौण खनिकरण विभाग यांच्यावर देखील संशय व्यक्त करण्यात येत आहे.महाडमधून वाहणाऱ्या सावित्री नदी आणि खाडीतून जानेवारी २०१६ मध्ये वाळू उत्खनन परवाना पारस हातपाटी संघटना, सागर श्रमिक हातपाटी संघटना, फै सल चांदले, शौकत इसाने अशा चार व्यावसायिकांनी घेतला होता. सर्व ठेक्यांची मुदत सप्टेंबर महिन्याच्या शेवटी संपली. पर्यायाने वाळू वाहतूक आणि विक्रीसाठी देण्यात आलेले परवाने रद्द झाले. वास्तविक पाहता उत्खनन बंदी लागू झाल्यापासून शासनाच्या महसूल विभागाने आणि पोलीस प्रशासनाने महाडमध्ये होणाऱ्या अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कारवाईचे धाडसत्र सुरू करणे अपेक्षित होते. मात्र तसे कोणतेही चित्र सध्या महाडमध्ये दिसून येत नाही. उलटपक्षी महाडमधील बांधकाम व्यावसायिकांच्या साईटवर वाळूचे ढीग टाकले जात आहेत. याकडे कोणीही अधिकारी पाहण्यास तयार नाही. चोरीच्या होणाऱ्या वाळू वाहतूक व उत्खननावर कारवाई करण्याऐवजी अनधिकृत धंद्यांना पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे.दोन वर्षांपूर्वी महाडच्या खाडीमध्ये ५ हजार ९७७ ब्रास चोरीची वाळू महसूल प्रशासनाकडून पकडण्यात आली होती. या वाळूचा लिलाव २०१४ पासून दोन वेळा करण्यात आला. मात्र एकावेळी एका व्यावसायिकाने काही प्रमाणात घेतला मात्र तोही वाळू बंदीच्या काळात दुसऱ्या वेळी या लिलावाला कोणीही हात घातला नाही. गेल्या महिन्यात महाड प्रांताधिकारी त्यांनी जप्त केलेल्या वाळूचा लिलाव काढला. वाळू बंदीच्या काळात हा लिलाव काढल्याने एका व्यावसायिकाने तो ताबडतोब उचलला. सध्या महाड तालुक्यातील विशाल महाडिक यांनी ८१६ ब्रासचा लाल वाळूचा लिलाव घेतला आहे. या परवान्याची विक्री मुदत ३० नोव्हेंबर २०१६ आहे. ही वाळू लालसर असल्याने या वाळूचा वापर बांधकामासाठी होणार नाही. अशा परिस्थितीत वाळू व्यावसायिक या वाळूच्या लिलावाखाली नवीन वाळूचा धंदा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या ज्या प्लॉटचे लिलाव करण्यात आलेले आहे, मात्र त्या प्लॉटवर वाळूच नसल्याची चर्चा नागरिकांकडून करण्यात येत आहे. तरी पुन्हा दिलेल्या प्लॉटची फेरतपासणी करण्याची मागणी प्रशासनाकडे नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच बंद वाळूच्या काळात हा लिलाव काढण्यात आल्याने वाळू व्यावसायिक तसेच महसूल अधिकारी यांचे संगनमत असल्याची चर्चा करण्यात येत आहे.