शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

एक्सेल कंपनीचे गोदाम खाक

By admin | Updated: October 23, 2016 03:36 IST

धाटाव औद्योगिक वसाहतीत गुरूवारी रात्री दीपक नाइट्राइट कंपनीत लागलेल्या आगीच्या पाठोपाठ शुक्र वारी रात्री एक्सेल इंडस्ट्रिजमधील फार्मा इंटरमिजिएट प्लान्टच्या

रोहा/धाटाव : धाटाव औद्योगिक वसाहतीत गुरूवारी रात्री दीपक नाइट्राइट कंपनीत लागलेल्या आगीच्या पाठोपाठ शुक्र वारी रात्री एक्सेल इंडस्ट्रिजमधील फार्मा इंटरमिजिएट प्लान्टच्या गोदामाला आग लागली. आगीत गोदाम भस्मसात झाले. रात्री दुसरी पाळी संपण्यापूर्वीच ही दुर्घटना घडली. सुदैवाने एकाही कर्मचाऱ्याला दुखापत झालेली नाही. मात्र आगीमुळे गोदामातील मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. औद्योगिक वसाहतीत एका मागोमाग एक झालेल्या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांसह कामगारांचे कुटुंबिय भयभीत झाले आहेत. एक्सेल इंडस्ट्रीजच्या फार्मा इंटरमिजिएट प्लान्टच्या गोदामामध्ये ट्रायल घेण्यासाठी इथाईल एसिटेट व एन हेप्टेन अशा दोन्ही सॉल्व्हन्टचे मिळून ६० ड्रम उत्पादनासाठी आणले होते. गोदाम प्लान्टपासून वेगळे आहे. रात्री १० वाजून ३५ मिनिटांनी एकादड्रमला आग लागल्याचे सुपरवायझरच्या निदर्शनात आहे. त्यांनी अन्य सहकार्यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. आणि काखान्यातीलआपत्कालीन संदेश यंत्रणेद्वारे आगीची सूचना दिली. पाणी व फोमच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळत नसल्याचे पाहून रोहा, माणगाव, नागोठणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. सुमारे बारा वाजून पाच मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा व्यवस्थापनाचा प्राथमिक अंदाज आहे.आग नियंत्रणात आणण्यासाठी औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यांचे सुरक्षा अधिकारी व व्यवस्थापन प्रतिनिधी तसेच वसाहतीतील उद्योजकांच्या संघटनेचे प्रतिनिधी यांनी तांत्रिक सहकार्य केले.घटनेची प्रांत रविंद्र बोंबले, तहसीलदार सुरेश काशीद, पोलीस निरिक्षक निशा जाधव, औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक तोतेवाड यांनी पहाणी केली आहे. आगीत मालमत्तेचे किती नुकसान झाले, याची तपासणी सुरु असून त्यानंतरच प्रत्यक्ष आकडा कळू शकेल, असे कारखान्याचे व्यवस्थापक हाशीराम मंचेकर यांनी सांगितले. (वार्ताहर)