शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

११ वर्षांनंतरही दरडग्रस्तांना पत्र्याच्या शेडचाच आधार

By admin | Updated: July 26, 2016 04:57 IST

संपूर्ण महाराष्ट्राला २५ आणि २६ जुलै २००५ रोजी पावसाने झोडपले. याच दिवशी महाडमध्ये महापुरासोबत दरडी कोसळल्या होत्या. या महापुरात आणि दरडीमध्ये दासगांव, जुई कोंडीवते

दासगाव : संपूर्ण महाराष्ट्राला २५ आणि २६ जुलै २००५ रोजी पावसाने झोडपले. याच दिवशी महाडमध्ये महापुरासोबत दरडी कोसळल्या होत्या. या महापुरात आणि दरडीमध्ये दासगांव, जुई कोंडीवते आणि रोहन या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवीत आणि वित्तहानी झाली होती तर अनेक गावातील हद्दीमध्ये दरडीही कोसळल्या होत्या. आजही गावोगावी कोसळलेले डोंगर महाडकरांच्या मनात दरडीच्या आठवणी ताज्या आहेत. जुई, कोंडीवते आणि रोहन या गावांमध्ये सामाजिक संस्थांनी दरडग्रस्तांना आधार दिला आणि त्यांची घरे उभी राहिली. मात्र दासगावमधील दरडग्रस्त ११ वर्षानंतरही पत्राशेडमध्ये राहण्याच्या नरकयातना भोगत आहेत.२००५ मधला २५ जुलै हा दिवस महाडकरांसाठी काळ्या दिवसाप्रमाणे उगवला. दिवस-रात्र पावसाच्या धारा कोसळत होत्या. या कोसळणाऱ्या पावसात एकमेकांशी होणारा संपर्क तुटला होता. जलमय महाड तालुक्याचा जगाशी संपर्क तुटला होता. महाड शहरात १० ते १५ फुट पुराचे पाणी साचले होते. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. आणि २५ जुलैच्या संध्याकाळी डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावांसाठी मात्र काळरात्र ठरली. पुराचा जोर कायम असतानाच रात्रीत दासगांव, जुई, रोहन, कोंडीवते या गावांमध्ये दरड कोसळली. या दरडीखाली १९० निष्पाप ग्रामस्थ गाडले गेले. दरडीखाली बेपत्ता झालेल्या मृतांना दरडग्रस्तांना भावना व मृतदेहाची होणारी विटंबना लक्षात घेवून शासनाने न सापडलेल्या ग्रामस्थांना मृत जाहीर केले. सव, कोथेरी, जंगमवाडी, चोचिंदे, करंजखोल दाभोळ आदि गावांमध्ये रहिवाशी वस्तीला दरडीचा धोका निर्माण झाला होता. पुराचा आणि दरडीने महाडमध्ये हाहाकार माजवला होता. दानशूर नागरिक आणि सामाजिक संस्थांनी महाडसाठी मदतीचे दरवाजे खुले केले होते. जनकल्याण ट्रस्टने दासगाव आदिवासी वाडी, कोंडीवते, कुर्ला दंडवाडी आणि रोहन, जुई या गावामध्ये जनकल्याण ट्रस्ट, लालबागचा राजा ट्रस्ट, प्राईड इंडिया आदि सामाजिक संस्थांनी या दरडग्रस्तांसाठी घरे बांधून दिली. मात्र शासनाने मृतांच्या परिजनांना दिलेली मदत आणि तात्पुरत्या निवाऱ्यासाठी पत्रा शेडव्यतिरिक्त काहीच दिले नाही. यामुळे आजही दासगांव दरडग्रस्त पक्क्या घरांच्या प्रतीक्षेत पत्राशेडच्या निवाऱ्यामध्ये जीवन कंठीत आहेत. दरड कोसळून उजाड झालेले डोंगर, जुई दासगाव, कोंडीवते या गावामधील बोडके झालेले डोंगर आजही या दरडीची आणि दरडीखाली गाडले गेलेल्या परिजनांच्या आठवणी २६ जुलै उजाडला की ताज्या होतात. (वार्ताहर)‘जनकल्याण’ची मदतजुई, कोंडीवते, दासगाव आणि रोहन या गावामध्ये सुमारे १४२ घरे बांधून दिली. ज्या गावांना अपेक्षित होते त्या गावांमध्ये निर्मल निकेतन कॉलेज आॅफ सोशल वर्क मुंबई येथून समाजसेवेच्या विद्यार्थ्यांकडून आणि जनकल्याणच्या कार्यकर्त्यांमार्फत तालुक्यातील बाधीत गावांचा सर्व्हे करु न मदत पोहोचविण्यात आली. दासगांवच्या या दरडग्रस्तांसाठी मागील दोन महिन्यांच्या दरम्यान शासनाने घरांसाठी जागा दिली आणि ९० हजार रुपये घर बांधण्यासाठी देण्याचे आश्वासन दिले. मात्र घर बांधणीचे हे पैसे आजही दासगाव दरडग्रस्तांना मिळाले नाहीत. यामुळे दासगाव दरडग्रस्त शासनाच्या उदासीनपणामुळे तात्पुरत्या पत्रा शेडमध्ये राहत आहेत.