शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक हल्ला करणाऱ्या चौघांना सक्तमजुरी

By admin | Updated: March 31, 2017 06:22 IST

तलवारी आणि काठ्यांनी प्राणघातक हल्ला करून उरण तालुक्यातील सारडे गावातील चंद्रकांत कमळाकर पाटील आणि

अलिबाग : तलवारी आणि काठ्यांनी प्राणघातक हल्ला करून उरण तालुक्यातील सारडे गावातील चंद्रकांत कमळाकर पाटील आणि अनिल कमळाकर पाटील या दोघांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोषी ठरवून याच गावातील आरोपी हेमंत पाटील, राजेंद्र पाटील, अजित पाटील व रवींद्र पाटील यांना येथील रायगड जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांनी सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा गुरुवारी सुनावली आहे.आरोपी हेमंत पाटील व अजित पाटील या दोघांना पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड तर राजेंद्र पाटील व रवींद्र पाटील या दोघांना तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड असे शिक्षेचे स्वरूप आहे. गावातील रस्त्याच्या बांधकामाच्या निमित्ताने शेतजमिनीच्या अतिक्रमणावरून वाद झाला. १९ मे २००८ रोजी रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपल्यावर आरोपींनी हा प्राणघातक सशस्त्र हल्ला केला होता. तपास करून उरण पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.आर.पेठकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. आठ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात महत्त्वपूर्ण ठरल्याचे अभियोग पक्षातर्फे न्यायालयात काम पाहणारे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)