शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चा

By admin | Updated: October 16, 2016 03:25 IST

तत्कालीन शासनाने १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन रद्द करून नवीन अंशदान पेन्शन योजना सुरू करुन शिक्षकांवर केलेल्या अन्याच्या

अलिबाग : तत्कालीन शासनाने १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन रद्द करून नवीन अंशदान पेन्शन योजना सुरू करुन शिक्षकांवर केलेल्या अन्याच्या निषेधार्थ व जुनीच पेन्शन पद्धती अमलात आणावी या मागणी करिता शनिवारी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र फुलावारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे काढला होता. मोर्चाला संपूर्ण रायगड जिल्ह्यातून कर्मचारी उपस्थित होते.योजनेत कर्मचाऱ्यांचे वर्तमान आणि भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित नाही. तसेच सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना या नवीन योजनेतून कोणताही लाभ मिळाला नाही. समान काम, समान वेतन कायदा असतानाही काहींना जुनी तर काहींना नवी पेन्शन योजना हे कोणत्या कायदयात बसणार आहे. या नवीन पेन्शन योजनेत सेवानिवृत्तीनंतर मिळणार लाभ हा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेल्या १० टक्के व शासनाच्या मिळणाऱ्या १० टक्के रक्कमेवर आधारीत आहे. निवृत्तीनंतर एकूण जमा राशीच्या ६० टक्के रक्कम मिळणार तर उर्वरित ४० टक्के राशीवर शासनाने इतरत्र गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर उदनिर्वाह करावा लागणार शासनाने ही योजना आणताना महाराष्ट्र नागरी सेवा १९८२ मध्ये सुधारणा असा शब्दप्रयोग करून कर्मचाऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात केला आहे.प्रत्यक्षात नियम १९८२ मधील एकही तरतूद नवीन नियुक्त कर्मचाऱ्यास लागू नाही. यासंबधी विधानसभा व विधानपरिषदेत प्रस्ताव मांडला नाही व नवीन कायदाही केला नाही म्हणून ही अन्यायकारक नावीन पेन्शन योजना बंद करून सर्व कर्मचाऱ्यांना १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र फुलावारे यांनी केली आहे. सेवेत असताना मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश या मोर्चातून शासनापर्यंत पोहचण्यासाठी व सर्व कर्मचाऱ्यांना १९८२ ची मुळ नागरी पेन्शन योजना लागू करा ही एकमेव मागणी घेऊ न हा आक्रोश मोर्चा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या या मागणीचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. यावेळी संघटनेचे राज्य संघटक अनिल नाचपल्ल, मारोती भोसले, अमोल माने, कपिल टोने आदी उपस्थित होते.(विशेष प्रतिनिधी)