शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

महाडमधील मतदार संघावर निवडणूक निरीक्षकाची नजर

By admin | Updated: February 16, 2017 02:13 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या २०१७ मधील २१ फेबु्रवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी महाड पोलादपूर तालुक्यासाठी

दासगाव : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या २०१७ मधील २१ फेबु्रवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी महाड पोलादपूर तालुक्यासाठी निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आचारसंहिता पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, भरारी पथक, व्हीडीओ पाहणी पथक अशा चार पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या सर्व पथकांना बुधवारपासून आपआपल्या कामगिरीवर रुजू करण्यात आले आहे. स्थिर पथकाकडून महाडमध्ये येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत असल्यामुळे एकच खळबळ माजली होती. या पथकांमुळे आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.महाड आणि पोलादपूर तालुक्यात निवडणूक शांततेत पार पडणे, तसेच आचारसंहितेचा भंग होवू नये यासाठी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी निरीक्षकपदी निवड करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहिता पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, भरारी पथक, व्हीडीओ पाहणी पथक अशी चार पथके तयार करण्यात आली आहेत. या चारही पथकांना बुधवारपासून तालुक्यातील सर्व मतदार संघावर नजर ठेवण्यासाठी कामगिरीवर लावण्यात आले. महाड तालुका मतदार संघावर करडी नजर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आचारसंहिता पथकाचे प्रमुख महाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे मुख्य आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १ पोलीस उपनिरीक्षक तसेच १ व्हिडीओ कॅमेरा आहे. तालुक्यातून कोणतीही तक्रार आल्यास त्या ठिकाणी जावून पाहणी करत योग्य ती कारवाई करण्याचे अधिकारी देण्यात आले आहेत.दुसरे स्थिर सर्वेक्षण पथक या पथकामध्ये महाड पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी, ग्रामसेवक तसेच पोलिसांचा समावेश आहे. हे पथक महाड शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्ता केंबुर्ली गावचे हद्दीत तसेच वरंध टॅपजवळ असे दोन ठिकाणी हे पथक तैनात करण्यात आलेले आहेत. या पथकांनी या ठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्या संशयित वाहनांची कसून तपासणी के ली.तिसरे भरारी पथक या पथकामध्ये चार मंडल अधिकारी तसेच तलाठ्यांचा समावेश आहे. या पथकांनी निवडणूक होईपर्यंत तालुक्यातील सर्व भागात मतदार संघात रस्त्यावर गस्त घालत संशयित ठिकाणी, तसेच संशय येणाऱ्या वाहनांची तपासणी करावयाची आहे. तर चौथे पथक व्हीडीओ पाहणी पथक या पथकामध्ये देखील पंचायत समितीमधील कक्ष अधिकारी यांचा समावेश असून या पथकांनी निवडणूक काळात मतदान होईपर्यंत सर्व पक्षांच्या होणाऱ्या रॅली, सभा यांची शूटिंग करून त्या सीडीची पाहणी करत या रॅली तसेच सभेमध्ये होणाऱ्या खर्चाचा अहवाल निरीक्षकांकडे सादर करणे, तसेच आचारसंहितेचा भंग करणाऱ्यावर लक्ष ठेवणे हे काम आहे. बुधवारपासून ही सर्व पथके संपूर्ण तालुक्यात कामाला लागली असून महाड शहराला जोडणारा मुख्य रस्ता या ठिकाणी स्थिर पथकाने बुधवारी सकाळपासूनच आपला मोहिमेला जोराने सुरुवात करत शहरामधून बाहेर पडणाऱ्या तसेच शहरामध्ये येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुरू केली होती. या पथकामुळे निवडणूक काळात होणारा पैशाचा गैरवापर, तसेच आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसणार असल्याचे मतदारांकडून बोलले जात आहे. (वार्ताहर)