शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

एकदरा ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

By admin | Updated: December 28, 2016 03:53 IST

ग्रामपंचायत कार्यालयातून तेथील रहिवाशांना जन्म दाखले, रहिवासी दाखले व विविध सेवा-सुविधा पुरविल्या जातात. परंतु विकासकामेच होत नसल्याने ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर

नांदगाव/ मुरुड : ग्रामपंचायत कार्यालयातून तेथील रहिवाशांना जन्म दाखले, रहिवासी दाखले व विविध सेवा-सुविधा पुरविल्या जातात. परंतु विकासकामेच होत नसल्याने ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर विश्वास उडाला आहे. यामुळे मुरुड तालुक्यातील एकदरा ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी टाळे ठोकले आहेत. एकदरा ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी सरपंच नाही त्यामुळे पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी एस.एच. वाणी यांच्याकडे सरपंचपदाचा कार्यभार आहे. अनुसूचित जमातीसाठी हे पद राखीव असल्याने येथे जातपडताळणी दाखला नसल्याने या पदाचा कार्यभार वाणी यांच्याकडे आहे.१३ तसेच १४ व्या वित्त आयोगाचे पैसे ग्रामपंचायतीला मिळाले आहेत. वर्तमानपत्रात निविदा प्रसिद्ध झाली, परंतु कामाचा पत्ता नाही. या योजनेतून गावासाठी अनेक विकासाची कामे होणार होती. परंतु सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन सुद्धा कोणतेही काम सुरु झाले नाही. पैसे असून सुद्धा विकासकामे करण्यात ग्रामसेवक व सरपंच टाळाटाळ करीत आहेत. गावातील पाणी योजनेची पाइपलाइन फार जुनी असून ती बदलणे खूप आवश्यक असताना सुद्धा या दुरु स्तीकडे या दोन अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. या ग्रामपंचायतीवर प्रशासक असून हे क्वचितच ग्रामपंचायतीला भेट देतात. मग गावाच्या विकासाकडे लक्ष कोण देणार असा प्रतिप्रश्न येथील गावकऱ्यांनी विचारला आहे. याबाबतचे रीतसर निवेदन गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात येऊन सुद्धा विकासकामाबाबत कोणतेच ठोस आश्वासन न दिल्याने अखेर जगन्नाथ वाघरे व असंख्य ग्रामस्थांनी मिळून या ग्रामपंचायतीला टाळे ठोकले आहे.याबाबत ग्रामसेवक राजेंद्र दवटे यांना विचारणा केली असता लवकरच विकासकामांची सुरु वात करणार असून हा वाद सामोपचाराने मिटवणार आहोत. गावात दोन विभाग असल्याने विकासकामांवर लवकर एकमत होत नसले तरी सुद्धा लवकरच विकासकामांना सुरु वात करू, असे ते यावेळी म्हणाले. ग्रामपंचायतीला कुलूप लावल्याने तालुक्यात सर्वत्र हा चर्चेचा विषय ठरला आहे. (वार्ताहर)