शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

आगरदांडा-सावलीया रस्त्याची खड्ड्यांमुळे झाली दुरवस्था

By admin | Updated: May 14, 2017 22:50 IST

मुरुड तालुका हे पर्यटन क्षेत्र असून येथील रस्त्यांची समस्या फार बिकट बनली आहे. आगरदांडा ते सावलीया भागातही बहुतांशी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे

लोकमत न्यूज नेटवर्कआगरदांडा : मुरुड तालुका हे पर्यटन क्षेत्र असून येथील रस्त्यांची समस्या फार बिकट बनली आहे. आगरदांडा ते सावलीया भागातही बहुतांशी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.गेले अनेक वर्षे हा रस्ता बनण्यासाठी अनेकांनी बांधकाम खात्याकडे निवेदने देण्यात आली होती. परंतु बांधकाम खात्याने रस्ता बनवण्यासाठी सजगता कधी ही दाखवली गेली नाही. त्या भागातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी आगरदांडा ते खोकरी हा दोन किलोमीटरचा रस्ता बनवून जणूकाही जबाबदारी संपली असे वागत आहेत. त्या रस्त्यावर जागोजागी सहा ठिकाणी पॅच मारण्याचे काम ठेवले आहे. त्या पॅचवर असंख्य खड्डे आहेत. यासंदर्भात बांधकाम खात्याचे उपअभियंता नीलेश खिलारे म्हणाले की, ते पॅच इस्टिमेटमध्ये नसून ते सहा नाही तर पाच आहेत. त्या पॅचवर असंख्य खड्डे असले तरी ते पॅच भरण्यात येणार नाही. परंतु साईटपट्ट्या लवकरात लवकर भरण्यात येतील असे यावेळी सांगितले.पावसाळा सुरु होण्याच्या आत रस्त्यावरचे खड्डे डांबर, खडी मिश्रण करून बुजवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नाहीतर अचानक रस्त्यावर येऊन आंदोलन करू असा इशारा यावेळी मिनीडोर रिक्षा संघटनेचे सदस्य पांडुरंग पोटदुखे यांनी दिला आहे.