शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीच्या संकटावर के ली जिद्दीने मात

By admin | Updated: October 15, 2016 06:48 IST

यंदा भातपिकाच्या पेरण्या वेळेवर झाल्या आणि पावसाने जोरदार सुरुवात केली, त्यामुळे बियाणे वाहून गेले. लावणी हंगामात शेतात लावणी केल्यानंतर

विजय मांडे / कर्जतयंदा भातपिकाच्या पेरण्या वेळेवर झाल्या आणि पावसाने जोरदार सुरुवात केली, त्यामुळे बियाणे वाहून गेले. लावणी हंगामात शेतात लावणी केल्यानंतर मुसळधार पाऊस पडू लागल्याने लावलेले भाताचे रोप वाहून गेले तरीही खचून न जाता एका प्रगतशील शेतकऱ्याने दोन वर्षांपूर्वी वापरलेल्या पध्दतीने भात बियाणाचे रोव तयार करून पेर भात पद्धतीने पेरणी के ली आणि भातपीक घेण्याचा निर्णय घेतला. त्या शेतकऱ्याच्या शेतात आता भरघोस भातपीक तयार होत आहे.यंदा चांगला पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. वेळेवर पाऊस सुरू झाल्याने बळीराजाने उत्साहात पेरण्या केल्या, काहींनी एसआरटी पद्धतीने पेरण्या केल्या होत्या कारण गेल्या वर्षी पावसाच्या अनियमितपणामुळे सुद्धा एसआरटी पद्धतीच्या पेरण्या उपयुक्त ठरल्या होत्या. यंदा पारंपरिक पद्धतीने केलेल्या पेरण्या मुसळधार पावसाने वाहून गेल्या तर एसआरटी पद्धतीने केलेल्या पेरण्यांचे बियाणे अतिपावसाने कुजले. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा पेरण्या करण्याची वेळ आली, परंतु वेळ निघून गेली होती. भातपीक हाती येईल काय, अशी शंका होती. या सर्वावर मात केली ती कोषाणे गावातील प्रगतशील शेतकरी हरिश्चंद्र तातू ठोंबरे यांनी. ठोंबरे यांनी आपल्या आठ एकर जमिनीवर एसआरटी पद्धतीने भातपीक लावले. लावताना त्यांनी सकाळी अर्धा एकर जमिनीवर पेरले व संध्याकाळी उर्वरित साडेसात एकर जमिनीवर भातपीक लावले. त्यानंतर लगेचच मुसळधार पावसाची सुरु वात झाली, रात्रभर पाऊस पडत होता. ठोंबरे पाच दिवसांनी शेतावर गेले तर सकाळी पेरलेल्या जमिनीतून भात रोपे वर आली, परंतु उर्वरित साडेसात एकर जमिनीतून एकही भात रोप वर आले नाही. पंधरा दिवस वाट पाहिली तरीही भात रोप वर येईना. भात बियाणे कुजून गेले होते. यामुळे ठोंबरे अस्वस्थ झाले, मात्र अचानक त्यांना दोन वर्षांपूर्वी केलेला प्रयोग आठवला. त्यावेळी खेकड्यांनी सर्वच्या सर्व भात रोपे फस्त केली होती. त्यावर कल्पना लढवून भात बियाणाचा रोव करून कीटकनाशक मिसळून ते पेरले आणि भात शेती तारली गेली. त्यांनी सकाळी तो प्रयोग करण्याचा निर्णय पक्का केला. चाळीस किलो भात बियाणाची लागवड के ली. त्यांचा हा प्रयोग यशस्वी होऊन आज भाताचे चांगले पीक शेतात दिसू लागले आहे.