शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी रुग्णालयाला खासगी वाहनांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 00:29 IST

जिल्हा प्रशासनाने कठाेर भूमिका घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क रायगड : अलिबाग येथील सरकारी रुग्णालयाला सध्या विविध वाहनांचा विळखा पडला आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास आतमध्ये अडकून पडलेल्यांना बाहेर पडणे कठिण तर आत जाणाऱ्यांनाही तेवढेच त्रासदायक ठरणार आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत कठाेर भूमिका घ्यावी, अशी मागणी हाेत आहे.

अलिबाग हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, पाेलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय अन्य महत्त्वाची सरकारी, निमसरकारी कार्यालये, बँका, जिल्हा बँक अशी अत्यंत महत्त्वाची कार्यालये आहेत. कामानिमित्त येथे सातत्याने वर्दळ असते. त्याचप्रमाणे अलिबाग हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण असल्याने या ठिकाणी माेठ्या संख्येने पर्यटकांचा राबता असताे. जिल्हा सरकारी रुग्णालयाची इमारत समुद्र किनाऱ्यापासून अगदी जवळ आहे, तसेच जिल्हा परिषदेचे कार्यालयही रुग्णालयाच्या समाेरच आहे. त्यामुळे या ठिकाणी वेड्यावाकड्या पद्धतीने वाहने पार्किंग करण्यात येतात. त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या आवारातच खासगी रुग्णवाहिकांचा गराडा २४ तास पडलेला असताे. रुग्णालयाच्या गेटसमाेरच माेठ्या संख्येने वाहने पार्किंग केल्याचे सर्रास पाहायला मिळते. नियमबाह्य पार्किंग केल्यामुळे रुग्णांना घेऊन एखादी रुग्णवाहिका आल्यावर तिला रुग्णालयाच्या आतमध्ये प्रवेश करताना अनेक अडचणी येतात, तर काही प्रसंगी रग्णवाहिका सरकारी रुग्णालयाच्या बाहेर पडतानाही बेकायदा पार्किंगमुळे अडकून पडतात.रुग्णालयामध्ये  आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास इमारतीमधील नागरिक, रुग्ण, आराेग्य कर्मचारी, डाॅक्टर आतच अडकून पडू शकतात.  आतमध्ये मदत पाेचवतानाही फार अडथळे पार करावे लागणार आहेत. याबाबत सातत्याने सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत, दिलीप जाेग, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्ता ढवळे यांच्यासह अन्य जागरुक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. 

n सरकारी रुग्णालयाच्या इमारतीवर काहीच वर्षांपूर्वी सुमारे ११ काेटी रुपये डागडुजीसाठी खर्च करण्यात आले हाेते. n इमारतीमध्ये जाण्यासाठी लिफ्ट (जी बरीच वर्षे बंद हाेती) जिने आणि रॅम्प (उतरते जिने) आहेत. त्यातील लिफ्टचा इतिहास पाहिला तर ती अधिक काळ बंद हाेती, जिने अरुंद आहेत, रॅम्पची पडझड झाली आहे.

वर्षभरात माॅकड्रील नाहीजिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये गेल्या वर्षभरात माॅकड्रील झालेले नाही. लवकरच अलिबाग नगरपालिका प्रशासनाशी बाेलून माॅकड्रील घेण्यात येईल. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागालाही याबाबत विनंती करण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुहास माने यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Raigadरायगड