शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By admin | Updated: December 4, 2015 00:25 IST

उन्हाच्या झळा डोक्यावर झेलत... कोणी हातावर चालत होते, तर कोणी कुबड्यांवर...आणि ज्यांना काहीच करता येत नव्हते त्यांना त्यांच्या नातेवाइकांनी अक्षरश: उचलून

अलिबाग : उन्हाच्या झळा डोक्यावर झेलत... कोणी हातावर चालत होते, तर कोणी कुबड्यांवर...आणि ज्यांना काहीच करता येत नव्हते त्यांना त्यांच्या नातेवाइकांनी अक्षरश: उचलून आणले होते. न्याय हक्कासाठी आज महाराष्ट्र राज्य कर्मचारी, अधिकारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मोठे दिव्य पार करावे लागले. जिल्हा प्रशासनातील एकही अधिकारी आंदोलकांच्या ठिकाणी गेला नाही. त्यामुळे आंदोलकांमध्ये नाराजीचा सूर होता. मोर्चासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अपंगांच्या मोर्चाला पोलिसांनी हिराकोट तलाव परिसरात अडविले. त्यानंतर संघटनेचे शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनाकडे निघाले. जिल्हाधिकारी यांचे दालन पहिल्या मजल्यावर असल्याने वर जाणार कसे असा प्रश्न त्यांना पडला. त्यानंतर काहींनी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार यांना उचलून नेले. आम्हाला न्याय पाहिजे. त्यामुळे आम्हाला तेथे जाणे भागच आहे. सरकार आणि प्रशासनाला खरोखरच आमच्याबद्दल काही वाटत असते, तर आमच्या मागण्या प्रलंबित राहिल्या नसत्या, असे जिल्हा संघटक व्ही.के.पाटील यांनी सांगितले.सरकारकडे प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र सरकारला अद्यापही गांभीर्य दिसून येत नाही. भारत सरकारने अपंग व्यक्ती कायदा १९९५ अधिनियम आणलेला आहे. या कायद्यातील तरतुदींची प्रभावी अंंमलबजावणी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अपंग कल्याण कृती आराखडा २००१ मंजूर केलेला आहे, मात्र त्याप्रमाणे कार्यवाही होत नाही, असे महाराष्ट्र राज्य कर्मचारी, अधिकारी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार यांनी सांगितले.(प्रतिनिधी)प्रमुख मागण्या- अलिबाग या मुख्यालयाच्या ठिकाणी अपंग भवन उभारणे- ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर पालिका यांच्या उत्पन्नातील ३ टक्के निधी अपंगांच्या पुनर्वसनासाठी खर्च करावा- खासगी उद्योगांमध्ये स्थानिक अपंगांना रोजगार मिळावा- संजय गांधी पेन्शनमध्ये वाढ करावी- संजय गांधी निराधार पेन्शन समितीवर अपंगांना प्राधान्य द्यावे- विधान परिषदेवर अपंगांचा एक प्रतिनिधी घ्यावा- स्वस्त धान्य मिळावे