शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या कामासाठी धार नदीचा पाणीउपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:13 IST

ग्रामस्थ संतप्त : वारे ग्रामपंचायतीच्या नोटिसीला केराची टोपली

कांता हाबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत-मुरबाड-शहापूर राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण ठेकेदार कंपनीकडून सुरू असून, या कामासाठी परिसरातील नदी नाल्यातून टँकरद्वारे पाणीउपसा सुरू केला होता. मात्र, भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, याकरिता स्थनिकांच्या मागणीनुसार कंपनीस पाणीउपसा थांबविण्यास सांगितले आहे. तरीही कंपनीने पाणीउपसा सुरू ठेवल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून, ठोस कारवाईची मागणी होत आहे.

वारे ग्रामपंचायत हद्दीतील वारे कुरुंग मार्गावरील धार नदीच्या पात्रातून दोन-चार महिन्यांपासून महामार्गाच्या ठेकेदार कंपनीकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता पाण्याचा बेसुमार उपसा सुरू आहे. परिणामी, नदीपात्रातील पाणीसाठा कमी होऊ लागला. या नदी परिसरातील आदिवासी बांधव या पाण्याच्या स्रोतावर अवलंबून आहेत. भाजीपाला लागवड करून आपली उपजीविका करत आहेत. त्याचप्रमाणे वन्यप्राणी, गुरांना उन्हाळ्यात याच पाण्याचा आधार आहे. मात्र, टँकरद्वारे होत असलेल्या बेसुमार पाणीउपशामुळे उन्हाळ्यात नदीपात्र कोरडे पडणार हे निश्चित. याची दखल घेऊन वारे ग्रा.प. सरपंच योगेश राणे, उपसरपंच नीलेश म्हसे, पोलीसपाटील व ग्रामस्थांनी बैठक घेतली. या वेळी भविष्यात होणाऱ्या पाणीटंचाईचा विचार करून हा पाणीउपसा बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठेकेदार कंपनीस नोटीस बजावण्यात आली. मात्र, त्या नोटिसीला केराची टोपली दाखवत ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता राजरोसपणे पाणीउपसा सुरू ठेवल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून, संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.रस्त्याच्या कामासाठी आमच्या ग्रामपंचायत हद्दीतील नदीतून होणाºया पाणीउपशाने भविष्यात या पाण्यावर अवलंबून असणाºया आदिवासीवाड्यांना पाणीटंचाई जाणवू शकते. याचा विचार करता आम्ही ठेकेदार कंपनीस उपसा करण्यास रोखले आहे. मात्र, तरीही पाणीउपसा होत असेल तर ग्रामस्थांसह जागेवर जाऊन नदीपात्रात जाणारा रस्ता बंद करावा लागेल.

टँकरद्वारे बेसुमार पाण्याचा उपसाच्महामार्गाच्या काँक्रीटीकरणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत आहे. यासाठी ठेकेदार कंपनीकडून महामार्ग परिसरातील नैसर्गिक नदी-नाल्यातून टँकरद्वारे बेसुमार पाणीउपसा सुरू आहे.च्त्यामुळे ज्या भागात पाण्यासाठी स्थानिक नदी-नाल्यांवर अवलंबून आहेत, तेथे भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, याचा विचार करून वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरुंग येथील धार नदीतील पाणीउपसा थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठेकेदार कंपनीस नोटीस बजावून पाणी उपसा थांबविण्यास सांगितले होते.- योगेश राणे, सरपंच, वारे ग्रामपंचायतकर्जत मुरबाड रस्त्याच्या कामासाठी होत असलेला पाणीउपसा लक्षात घेता भविष्यात या भागात पाणीटंचाई येणार आहे, याकरिता ग्रामस्थांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीकडून या ठेकेदार कंपनीस नोटीस बजावून पाणीउपसा थांबवण्यास कळवले आहे. मात्र, नोटीस देऊनही पाणीउपसा सुरू असल्याचे समजते, त्यावर कारवाई केली जाईल.- नीलेश म्हसे, उपसरपंच, वारेग्रामपंचायतीने नोटीस देऊन ही कंपनी आपली मनमानी करत आहे. त्यामुळे भविष्यात आमच्या नदीचे पात्र कोरडे पडणार आहे. त्याचे परिणाम ग्रामस्थांसह वन्य प्राण्यांनाही भोगावे लागणार आहे. ग्रामपंचायतीने या विषयी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.- महेश रामचंद्र म्हसे, ग्रामस्थ