शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे पालन करून भक्तांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:30 IST

कार्तिकी एकादशीनिमित्त रायगडमध्ये २१८ मंदिरांत विधीवत पूजा

निखिल म्हात्रेअलिबाग : कार्तिकी एकादशीनिमित्त रायगड जिल्ह्यातील सुमारे २१८ विठ्ठल मंदिरांत गुरुवारी पहाटेपासूनच विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात कार्तिकी एकादशी साजरी करण्यात आली. अलिबाग शहराजवळच्या वरसोली येथील प्राचीन आंग्रेकालीन विठ्ठल-रखुमाई मंदिरात पहाटेपासूनच विधीवत पूजा करण्यात आली. कोविडमुळे नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन ट्रस्टींकडून करण्यात आले होते.

वाढता कोरोना संसर्ग असल्याने अलिबाग तालुक्यातील भक्तगणांंनी वरसोली येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गर्दी न करता मोबाइलवर दर्शन घेतले. मंदिर विश्वस्त व संयोजन समितीच्या वतीनेदेखील भाविकांना दर्शनात कोणतीही असुविधा होऊ नये याकरिता उत्तम नियोजन केले होते. कार्तिकी एकादशीच्या दिवशी भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी पाहता जिल्ह्यात असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व्यवस्थापनाने विविध उपाययोजना केल्या होत्या. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचाही ठिकठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकादशीच्या आदल्या दिवसापासून मंदिर व्यवस्थापनाने जय्यत तयारीला सुरुवात केली होती. मात्र, या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भक्तांनी ऑनलाईन दर्शनाला पसंती दिली होती. गुरुवारी पहाटे जिल्ह्यातील मंदिरांमध्ये श्रीविठ्ठल-रुक्मिणीची विधीवत पूजा पुरोहितांच्या हस्ते पार पडल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे नव्हती गर्दी श्रीविठ्ठल-रुक्मिणीला तुळस प्रिय आहे. पण, ठिकठिकाणच्या मंदिरांसमोर तुळशीच्या माळा विकणाऱ्यांचीही गर्दी नव्हती. प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या खालापूर तालुक्यातील साजगावचे श्रीविठ्ठल मंदिर आणि अलिबागजवळील वरसोली येथील आंग्रेकालीन श्रीविठ्ठल मंदिरात काही भक्तांनी जाऊन देवदर्शन घेतले. मात्र दरवर्षीप्रमाणे गर्दी नव्हती. तर दुसरीकडे गावोगावच्या श्रीविठ्ठल मंदिरांतही भाविकांनी नियमांचे पालन करून दर्शन घेतले.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग