शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

सूरजचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू

By admin | Updated: March 15, 2016 00:54 IST

येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात एका रुग्णाचा शस्त्रक्रियेदरम्यान रविवारी मृत्यू झाल्याची घटना घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा ठपका नातेवाइकांसह ग्रामस्थांनी ठेवला.

अलिबाग : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात एका रुग्णाचा शस्त्रक्रियेदरम्यान रविवारी मृत्यू झाल्याची घटना घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा ठपका नातेवाइकांसह ग्रामस्थांनी ठेवला. डॉक्टरांना तातडीने बेड्या ठोका, अशी मागणी करून सुमारे तीनशेच्या जमावाने तब्बल आठ तास आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाला वेठीस धरले होते. सूरजच्या शवविच्छेदनाचा अहवाल जे. जे. रुग्णालयातून सायंकाळपर्यंत पोलिसांना उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी तीनही डॉक्टरांना ताब्यात घेतल्याचे अलिबाग पोलिसांनी सांगितले.अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथील सूरज पाटील (२३) याला मणक्याचा त्रास होता. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर साठ्ये हे त्याच्यावर उपचार करीत होते. रविवारी सूरजवरती शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबई येथील तज्ञ डॉक्टारांना पाचारण करण्यात आले होते. डॉ. साठ्ये, भूलतज्ज्ञ डॉ. महेंद्र घाटे या डॉक्टरांचा पथकामध्ये समावेश होता. शस्त्रक्रियेदरम्यान सूरजचा मृत्यू झाला. मात्र डॉक्टरांनी ही माहिती नातेवाइकांना दिली नाही. काही कालावधीनंतर डॉक्टरांनी सूरजचा मृत्यू झाल्याचे नातेवाइकांना रात्री नऊच्या सुमारास सांगितले. (प्रतिनिधी)कुटुंबावर दु:खाचा डोंगर सूरजचे सुमारे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. सूरजला एक अपत्यही आहे. सूरज गेल्याने त्यांच्या पत्नीसह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी सायंकाळी सूरजचे शव त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुहास वराडे यांनी दिली.