शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

दासगावात रसायनाने भरलेला टँकर पलटी

By admin | Updated: December 29, 2016 02:51 IST

दासगावच्या हद्दीत भरवस्तीत बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रसायनाने भरलेला टँकर पलटी झाला. या अपघातानंतर टँकरला मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली.

दासगाव : दासगावच्या हद्दीत भरवस्तीत बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रसायनाने भरलेला टँकर पलटी झाला. या अपघातानंतर टँकरला मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली. यामुळे संपूर्ण परिसरामध्ये नागरिकांना उलटी, चक्कर, घशाला खवखव, श्वसनाचा त्रास जाणवू लागला. या अपघातामध्ये टँकर चालकासह दासगाव येथील दोन ग्रामस्थ असे तिघे जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.मुंबई-गोवा महामार्गावर २८ डिसेंबरला सकाळी ८ च्या सुमारास दासगाव गावच्या हद्दीत उतारावर महाड औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी आॅरगॅनिक्स या कारखान्याच्या मुंबईतील चेंबूर या ठिकाणाहून अ‍ॅसिडिक अ‍ॅसिड घेवून येणारा भरलेला टँकर पलटी झाला. पलटी होताच हा टँकर रस्त्याच्या कडेला कठड्याला धडकला व अर्धा रस्त्यावर व अर्धा रस्त्याबाहेर पलटी झाला. धडकेनंतर दासगावचे दोन ग्रामस्थ सचिन पयेलकर (२८) व संदेश जाधव (४०) हे दोघेजण दगडाच्या माराने, तसेच टँकरचालक राजाभान गणेश सकिन (रा. उत्तर प्रदेश )असे तिघे जण जखमी झाले. अपघातानंतर टँकरला गळती सुरू झाली. टँकरमधील रसायन १० दुकाने तसेच आयसीआयसीआय बँक, पोस्ट आॅफिस तसेच दवाखाना यांच्या समोरील रस्त्यावरून वाहण्यास सुरू झाले. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस असलेल्या घरातील नागरिकांना विविध त्रास होण्यास सुरुवात झाली. अपघातानंतर जवळपास एक तास या ठिकाणी तालुक्यातील कोणतीही शासकीय यंत्रणा पोहचू शकली नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणेवर नाराजी व्यक्त करण्यात येत होती.अ‍ॅसिडिक अ‍ॅसिडच्या त्रासाची तीव्रता जाणवताच जवळच असलेली जिल्हा परिषदेची मराठी शाळा व हायस्कूल यांना सुटी देण्यात आली. तर आयसीआयसीआय बँक, पोस्ट आॅफिस हे देखील बंद ठेवण्यात आले होते. दवाखाना व हॉटेल, छोट्या १० ते १२ टपऱ्या यादेखील दिवसभर बंद होत्या. त्यामुळे परिसरात शुकशुकाट होता. दोन घरांमध्ये अ‍ॅसिड शिरल्याने या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाण्याच्या दोन विहिरींनाही धोका निर्माण झाला आहे. (वार्ताहर)दोन तासांत नियंत्रणअपघाताची माहिती महाड एमएमएचे अध्यक्ष संभाजी पठारे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी सेफ्टीचे अधिकारी सी. डी. देशमुख यांना पाठवून घटनेवर नियंत्रण आणण्याचे काम केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन फायटर तसेच दोन रुग्णवाहिका या ठिकाणी तयार ठेवण्यात आल्या होत्या. दोन तासांनंतर अ‍ॅसिडिक अ‍ॅसिडवर नियंत्रण आणण्यात महाड फायर फायटर तसेच लक्ष्मी आॅरगॅनिक्स कारखान्याची टीम व सेफ्टी टीम यांना यश आले.तलाठ्यांनी के लानुकसानीचा पंचनामा अपघातानंतर दासगावचे पोलीस हवालदार धनाजी पिंगळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अ‍ॅसिड गळत असताना दोन जखमींना या ठिकाणाहून बाहेर काढले. यामुळे परिसरात त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. घटनेच्या ठिकाणी महाड तहसीलदार औदुंबर पाटील, नायब तहसीलदार महेंद्र बेलदार, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अमित लाटे, वेसावे यांनी पाहणी के ली.घटनेचे गांभीर्य पाहून अधिकारी येथील वातावरण शांत होईपर्यंत ठाण मांडून बसले होते. अपघातानंतर संध्याकाळपर्यंत या परिसरात नागरिकांना त्रास जाणवतच होता. परिसरातील नुकसानीचे पंचनामे दासगावचे तलाठी संदेश पानसारे यांच्या मार्फत सुरू करण्यात आले. याचा अहवाल लक्ष्मी आॅरगॅनिक्स कारखान्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पानसारे यांनी दिली.