शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

चिरनेरमध्ये गोदामाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 03:15 IST

चिरनेर-भोम परिसरातील एका गोदामाला सोमवारी रात्री १०च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपये किमतीचा कापूस आणि कडधान्य जळून खाक

- लोकमत न्यूज नेटवर्कउरण : चिरनेर-भोम परिसरातील एका गोदामाला सोमवारी रात्री १०च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपये किमतीचा कापूस आणि कडधान्य जळून खाक झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाचे सहा बंब अविरतपणे प्रयत्न करीत होते. अखेर १५ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास आग आटोक्यात आली. आगीत गोदाम पूर्णत: खाक झाले असून सुमारे १० कोटींची मालमत्ता जळून खाक झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, असे उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी सांगितले.उरण तालुक्यातील चिरनेर-भोम रस्त्यावर पी. पी. खारपाटील कंपनीचे गोदाम आहे. भल्यामोठ्या गोदामात कापूस आणि तूर आदी प्रकारातील कडधान्याचा साठा आयात-निर्यातीसाठी ठेवण्यात आला होता. सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास गोदामाला भीषण आग लागली. ज्वलनशील कापूस आणि कडधान्य आगीच्या भक्षस्थानी पडल्याने आगीने आणखी रौद्ररूप धारण केले. आगीची माहिती मिळताच उरण पोलीस, उरण तहसीलदार आदींनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर मंगळवारी दुपारच्या सुमारास आग आटोक्यात आली. आगीत कापूस आणि कडधान्य जळून भस्मसात असून सुमारे १० कोटी मालमत्तेचे आर्थिक नुकसान झाल्याचा, तसेच शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज तहसील कार्यालयाकडून वर्तवला जात आहे. घटनास्थळी पोलीस पथक अधिकाऱ्यांसह तैनात करण्यात आले असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र आव्हाड यांनी दिली.