शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यात चक्रीवादळाने पाच कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:53 IST

जनजीवन विस्कळीत : ६२१५ शेतकऱ्यांचे तर २५० शासकीय मालमत्तांचे नुकसान

विजय मांडे

कर्जत : निसर्ग चक्रीवादळाने कर्जत तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांची घरे, शेती, बागा आणि शासकीय मालमत्तांचे साधारण पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या वादळाने ६२१५ शेतकºयांचे तर २५० शासकीय मालमत्तांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान आहे.

३ जून रोजी दुपारी दोन वाजता आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने कर्जत तालुक्यात तब्बल चार तास धुमाकूळ घातला होता. मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली असून वीजपुरवठा करणारे महावितरणचे २०० हून अधिक खांब कोसळले आहेत. तालुक्यातील शेतकºयांच्या राहत्या घरांचे आणि शेती, बागांचे वादळाने मोठे नुकसान केले आहे. त्यात ३१९४ पक्क्या घरांवरील छपरे उडून गेली असून कच्च्या स्वरूपात असलेल्या २६६३ घरांची कौले आणि झापे उडून गेले असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.झोपडी स्वरूपात असलेल्या ३५५ घरांचे वादळाने नुकसान केले असून आजच्या तारखेला छपरे उडून गेलेल्या साधारण ३२१५ घरांचे पंचनामे महसूल विभागाने पूर्ण केले आहेत तर ४१२ शेतकºयांच्या बागायती शेतपिकाचे वादळाने नुकसान केले असून त्या नुकसानग्रस्त १५८ शेतीचे पंचनामे कृषी विभागाकडून पूर्ण करण्यात आले आहेत.तालुक्यातील शासकीय मालमत्तेचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यात ग्रामपंचायत कार्यालये, जिल्हा परिषदेचे विश्रामगृह, अंगणवाडी इमारत, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र आणि प्राथमिक शाळा यांचा समावेश असून ही सर्व नुकसानीची आकडेवारी साधारण पाच कोटी रुपयांची असल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला आहे.खासगी मालमतांचे झालेले नुकसान हे शासनाच्या निकषाप्रमाणे निधी प्राप्त झाल्यानंतर वाटप केले जाणार आहे.पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवरच्महसूल विभागाला पंचनामे करण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी तसेच कर्जत पंचायत समिती विभागाकडून ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि कृषी विभागाकडून कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांची मदत मिळत आहे.च्वादळाने नुकसान केलेल्या सर्व ६२१५ घरांचे आणि शेतीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून अर्धे पंचनामे करण्यात शासनाला यश आले आहे, अशी माहिती कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख,कर्जत पंचायत समितीचेप्रभारी गटविकास अधिकारीपी.टी. रजपूत, तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी दिली आहे.

टॅग्स :Raigadरायगड