शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : काेराेनामुळे माेलकरणींसाठी अनेक दरवाजे बंद, कुटुंबाचा गाडा कसा चालणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 00:07 IST

CoronaVirus News : जिल्ह्याची रुग्ण संख्या तब्बल ८२ हजार ९१२ वर पाेहोचली आहे, त्यापैकी ७३ हजार २०३ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या साडेसात हजाराहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.

- आविष्कार देसाई

रायगड : काेराेनाच्या भीतीने अनेकांनी घरातील माेलकरणींना कामावरून कमी केले आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या माेलकरणींना आपल्या कुटुंबांचा गाडा कसा ओढायचा, असा प्रश्न पडला आहे. सरकारने माेलकरीणीसारख्या असंघटित कामगारांसाठी काही तरी करावे, अशी मागणी हाेत आहे. काेराेनाच्या रुग्ण संख्येत दरराेज झपाट्याने वाढ हाेत आहे.जिल्ह्याची रुग्ण संख्या तब्बल ८२ हजार ९१२ वर पाेहोचली आहे, त्यापैकी ७३ हजार २०३ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या साडेसात हजाराहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या दिवसाला किमान १ हजार रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या चिंतेत भर पडली आहे. काही महिला या नाेकरी करतात. या महिला घरकामासाठी माेलकरीण ठेवतात. या माेलकरीण महिला एकाच वेळेला सुमारे पाच घरांमध्ये काम करतात. काेराेनाच्या वाढत्या संसर्गाने या महिलांनाही कामावर येऊ नका असे, सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना घरात राहण्याशिवाय पर्याय  नाही. राेजगार गेल्याने या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे.

घर कसे चालवावे याची चिंतामाेलमजुरी हाच व्यवसाय आहे. चार ठिकाणी काम केल्यावर महिन्याकाठी काही रक्कम हातात पडते. त्यावरच कुटुंबाचा चरितार्थ सुरू असताे. काेराेनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे कामावर येऊ नका, असे गृहनिर्माण साेसायटीवाले सांगतात. हातचे काम गेल्याने काय खायचे? असा प्रश्न आहे.

 एका घरातून मिळतात ७०० रुपयेकपडे-भांडी केल्यावर दीड हजार रुपये मिळतात. काही फक्त कपडे अथवा भांडी घासण्याचेच काम देतात. त्यासाठी ७०० रुपये पदरात पडतात. किमान तीन ते चार ठिकाणी काम मिळते. आता मात्र ठप्प झाले आहे.

अर्थकारणाचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न पडला आहे. महागाईने सर्वच महाग झाले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक ओढाताण हाेत असताना आता तर हाताला काम राहिलेले नाही. त्यामुळे कुटुंबाचे पाेट कसे भरायचे, असा प्रश्न आहे. सरकारने आमच्या सारख्या असंघटित कामगारांचा विचार करणे गरजेचे आहे.  - मनिषा पडीयार

तुम्ही चार ठिकाणी काम करायला जाता त्यामुळे काेराेनाचा फैलाव हाेऊ शकताे. तुम्ही कामावर येऊ नका, असे साेसायटीवाले सांगतात. त्यामुळे आमचा राेजगार हिरावला गेला आहे. आमच्यासह आमच्या कुटुंबाची काळजी असल्याने आम्ही काेराेनाचे नियम पाळताे.             - वंदना म्हात्रे

सुरुवातीला चार-पाच घरातील काम करता यायचे. त्यामुळे महिन्याला चांगले पैसे मिळायचे; परंतु काेराेनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वच धास्तावले आहेत. आम्ही ज्या ठिकाणी काम करताे त्यांनीच सांगितले की, काही दिवस कामावर येऊ नका. काेराेनाचे संकट अजून किती दिवस राहणार, देव जाणे.- सायली निगम 

टॅग्स :alibaugअलिबाग