शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: रायगड जिल्ह्यात खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 00:40 IST

प्रशासनाच्या प्रसिद्धी पत्रकापूर्वीच दुकाने खुली, पोलिसांची झाली तारांबळ

निखिल म्हात्रे

अलिबाग : रायगड जिल्ह्यात संचारबंदी शिथिल करण्यात आली असल्याचे प्रसिद्धी पत्रक जिल्हा प्रशासनाने रविवारी रात्रीपर्यंत जाहीर केले नव्हते. कोणती दुकाने सुरू राहणार वा बंद राहणार ते स्पष्ट केले नसल्यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. जिल्हा प्रशासनाकडून येणाऱ्या प्रसिद्धी पत्रकापूर्वीच सोमवारी सकाळी रायगड जिल्ह्यातील काही दुकानदारांनी आपली दुकाने खुली केली होती. तर दुसरीकडे बंद असलेल्या वाइन शॉपसमोर नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे सोशल डिस्टन्सचे रायगड जिल्ह्यात तीनतेरा वाजले. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी वेळीच धाव घेऊन दुकान बंद करीत गर्दी कमी केली.

रायगड जिल्हा आॅरेंज झोनमध्ये आल्यावर संचारबंदीमधील काही अटी व शर्ती काही प्रमाणात शिथिल होतील, अशी अशा नागरिकांना होती. मात्र, जिल्हा एमएमआरमध्ये येत असल्याने पूर्वीप्रमाणेच संचारबंदी, लॉकडाउन कायम राहणार आहे. याची कल्पना जिल्हा प्रशासनाने रविवारी सायंकाळपर्यंत नागरिकांना दिली नसल्यामुळे नागरिकांनी रायगड जिल्ह्यातील संचारबंदीच्या अटी शिथिल केल्या असल्याचे समजून घराबाहेर पडण्यास सुरुवात केली होती. नेहमी ओस पडलेल्या रस्त्यांवर सोमवारी सकाळपासूनच वाहनांची रेलचेल सुरू होती.

सोमवारी सकाळपासूनच नागरिकांची पावले बाजारपेठांकडे वळली होती. जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरी भागात मोठ्या प्रमाणावरगर्दी केली होती. एक वस्तू खरेदी करण्यासाठी कुटुंबातील दोन व्यक्ती घराबाहेर पडल्याचे या वेळी दिसून आले. एकाच वेळी नागरिकांनी गर्दी केल्याने पोलिसांना गर्दी हटविणे जिकिरीचे झाले होते. मात्र योग्य प्रकारे पोलिसांनी परिस्थिती हताळली.निर्र्बंधासह संचारबंदी काही ठिकाणी शिथिलज्या वाहनांना व व्यक्तींना वाहतुकीची परवानगी मिळाली आहे, त्यांना वाहतुकीस परवानगी राहणार आहे. चारचाकी वाहनांमध्ये वाहनचालक व दोन प्रवाशांना प्रवास करण्यास परवानगी आहे. दुकाचीवरून एकाच व्यक्तीला प्रवास करता येणार आहे. शहरी भागातील औद्योगिक संस्था, मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर रिजन) महानगर पालिका क्षेत्र (पनवेल महानगरपालिकेचे क्षेत्र) वगळून विशेष अर्थिक क्षेत्र (सेझ) निर्यातक्षम केंद्र, औद्योगिक वसाहत व औद्योगिक शहरे काही निर्र्बंधासह सुरू राहणार आहेत. रायगड जिल्ह्यातील परमिट रुम, सोशल क्लब, आॅर्केेस्ट्रा, मनोरंजनाची ठिकाणे, सलुन, स्पा, ब्युटी पार्लर बंद राहणार आहेत. तर राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र यांनी दिलेल्या निर्देशानुसार मान्यताप्राप्त दुकानांमध्ये मद्य विक्री व बीयर शॉपीमध्ये बीयर विक्री सुरू राहणार आहे. तसेच दुकानासमोर मार्किंग करणे अवश्यक असून फक्त पाच माणसेच असणे अवश्यक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या