शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

घनकचऱ्यासह नाल्यातील गाळही डम्पिंगवर ठेकेदाराचे साटेलोटे; शिवसेनेची महापालिकेकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 23:25 IST

सिडकोने कळंबोली वसाहतीतील पावसाळी नाल्यांमधील कचरा, गाळ काढण्याचे काम ठेकेदाराला दिले आहे.

कळंबोली : सिडकोने पनवेल परिसरासोबत कळंबोली नोड हस्तांतर करण्यापूर्वी आठ कोटी रुपयांची कामे हाती घेतली आहेत. त्यामध्ये पावसाळी गटार यांचाही समावेश आहे. गटारांमधून काढलेली माती सिडकोच्या ठेकेदाराने उचलायला हवी होती. मात्र, ती पनवेल महापालिकेच्या ठेकेदाराने उचलण्यास सुरुवात केली.

पनवेल महापालिका, घनकचरा उचलण्याचे आणि तो डम्पिंग ग्राउंडवर वाहतुकीसाठी ठेकेदाराला टनाप्रमाणे पैसे देते. जितके जास्त वजन तितके जास्त पैसे ठेकेदाराला दिले जातात, त्यामुळे जास्त वजन भरावे म्हणून अनेक पर्याय स्वीकारले जात आहेत. कचºयामध्ये माती आणि डेब्रिज मिसळून वजन वाढवण्याचे प्रकार सध्या सर्रास सुरू आहेत. यामध्ये सिडको आणि महापालिकेच्या ठेकेदाराबरोबरच अधिकाऱ्यांचेही साटेलोटे असल्याचा आरोप शिवसेनेचे विधानसभा संघटक दीपक निकम यांनी केला आहे. तर याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे निकम यांनी सांगितले. याआधी कचरा उचलण्याचे काम सिडकोने महापालिकेकडे सोपविले आहे. घनकचरा व्यवस्थापन मनपाचे आरोग्य विभाग करीत आहे. यासाठी साई गणेश हा ठेकेदार नेमलेला आहे. मात्र, कचरा उचलणारा ठेकेदार नियमाचे पालन करीत नाही. बुधवारी तर महापालिकेच्या कचरा उचलण्यासाठी असलेल्या गाडीमध्ये कळंबोली पोलीस ठाण्यासमोरील नाल्यातून काढण्यात आलेली माती टाकण्यात आली. निम्म्याहून जास्त डम्पर मातीने भरल्यानंतर तो कळंबोली कातकरवाडीतील कचºयाच्या ढिगाकडे नेण्यात आल्याचे शिवसेनेचे विधानसभा संघटक दीपक निकम यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत आक्षेप घेतला आहे.सिडकोने कळंबोली वसाहतीतील पावसाळी नाल्यांमधील कचरा, गाळ काढण्याचे काम ठेकेदाराला दिले आहे. त्यात त्याने माती आणि कचरा बाहेर काढून ढीग लावले आहेत. ही माती उचलण्याचे काम संबंधित ठेकेदाराचे आहे. मात्र, अनेक ठिकाणी पनवेल महापालिकेचे कामगारच ही माती उचलत असल्याचे बुधवारी उघडकीस आले. त्यामध्ये कचरा मिसळून महापालिकेकडून पैसे उकळले जात असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापनाचे सहायक आयुक्त श्याम पोशेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.आमच्याकडे मनुष्यबळ नाही, असे पनवेल महापालिकेकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मग सिडकोने काढलेली माती उचलण्याकरिता महापालिकेकडे माणसे आली कुठून? जे काम सिडकोचे आहे, ते महापालिकेचा ठेकेदार का करतो? या मागे काहीतरी गौडबंगाल आहे, असा शिवसेनेचा स्पष्ट आरोप आहे. याबाबत योग्य चौकशीसाठी आयुक्तांकडे तक्रारही करण्यात येणार आहे. - दीपक निकम, पनवेल विधानसभा संघटक, शिवसेना

टॅग्स :panvelपनवेल