शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By admin | Updated: October 14, 2016 06:39 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियान २०१७ मध्ये पूर्णत: बंद होणार आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांच्यावर

अलिबाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान २०१७ मध्ये पूर्णत: बंद होणार आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांच्यावर बेकारीची कु ऱ्हाड कोसळणार आहे. केंद्र सरकारच्या आडमुठे धोरणाविरोधात रायगड जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी गुरु वारी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. काम बंद आंदोलनामुळे कामानिमित्त येणाऱ्यांना मात्र त्याचा त्रास सहन करावा लागला. राज्यातही सर्व जिल्ह्यात हे धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानामुळे रायगडसह राज्यात आरोग्याचे चांगले काम झाले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान ही योजना २०१७ नंतर कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. त्याचा फटका रायगडसह राज्यातील सुमारे ६० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना बसणार आहे. याआधीही आपल्या मागण्यांसंदर्भात पहिल्या टप्प्यात २४ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत काळ्या फिती लावून काम केले होते. दुसऱ्या टप्प्यात २ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मात्र तरीही सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्या विरोधात १३ आॅक्टोबर रोजी एक दिवसाचे कामबंद आणि धरणे आंदोलन करण्यात आल्याचे संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष विकास धुमाळ यांनी सांगितले.निवडणुकीच्या आधी भाजपाचे सरकार आल्यावर तुम्हाला रस्त्यावर बसू दिले जाणार नाही, असे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी आश्वासन दिले होते. मात्र सरकारची दोन वर्षे उलटून गेली तशी आश्वासनेही विरून गेली. निवडणुकीसाठी आमचा फायदा घेऊन आमचे प्रश्न मात्र अधांतरीच ठेवले आहेत. योजना २०१७ ला पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तुमच्या संबंधीचा निर्णय हा राज्य सरकारने घ्यावयाचा आहे, असे स्पष्ट केंद्र सरकारने राज्य सरकारला सांगितले असल्याचे संघटनेने सांगितले. धरणे आंदोलनाची सरकारने दखल घेतली नाही तर २६ आॅक्टोबरला मुंबई येथे मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, तसेच डिसेंबर महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषण करणार असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. रायगड जिल्हा परिषदेसमोर बसलेल्या या आंदोलकांना अलिबाग मुरु ड विधानसभेचे आ. पंडित पाटील व जिल्हा परिषद बांधकाम सभापती चित्रा पाटील यांनी भेट दिली. या आंदोलनासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)