शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

रस्त्याच्या कामात फसवणूक, व्हायब्रेटर न वापरता नेरळमध्ये काँक्रिटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 03:16 IST

नेरळ गावात सिमेंट काँक्रीटच्या आरसीसी रस्त्यांची कामे सुरू आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नियमानुसार आरसीसी काँक्रीट दाबण्यासाठी व्हायब्रेटर वापरले जाणे आवश्यक आहे.

संजय गायकवाड कर्जत : तालुक्यातील नेरळ गावात सिमेंट काँक्रीटच्या आरसीसी रस्त्यांची कामे सुरू आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नियमानुसार आरसीसी काँक्रीट दाबण्यासाठी व्हायब्रेटर वापरले जाणे आवश्यक आहे. तसेच लोखंडी प्लेट लावून, ते रस्ते नटबोल्टने जुळवून कामे करणे आवश्यक असताना, या तांत्रिक बाबींचा उपयोग केला जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.नेरळ गाव हे एमएमआरडीएअंतर्गत असलेले महत्त्वाचे गाव असून, मुंबईचे उपनगर म्हणून या गावाकडे पाहिले जाते. माथेरान या जागतिक दर्जाच्या पर्यटन केंद्राकडे जाण्यासाठी प्रवेशद्वार समजले जाणाºया या गावातील रस्ते मुंबईच्या धर्तीवर असावेत, यासाठी आरसीसी रस्ते बनविताना काळजी घेतली जात आहे. २३ कोटींचा निधी वर्ग करताना प्राधिकरणाने नेरळ गावातील रस्ते करताना रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने कामाचा दर्जा कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.मात्र, आता केवळ दुसºया भागात रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्याच्या कामाचा दर्जा ठेवण्यात जिल्हा परिषद कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. प्राधिकरणाच्या निधीमधून नेरळ गावातील रस्ते आरसीसी काँक्रीटचे करताना घालून दिलेले निर्देशांची ठेकेदाराकडून अंमलबजावणी केलेली दिसून येत नाही. कारण माथेरान रस्त्यावर रस्त्याचे काँक्रीटीकरण करताना आणि आता मुरबाड रस्त्यावर आरसीसी काँक्रिटचा रस्ता बनविताना प्रामुख्याने दोन तांत्रिक बाबींचा वापर करण्याचे टाळले आहे. त्यामुळे रस्त्याचे आयुष्यमान कमी होण्याची शक्यता असून, अल्पावधीत रस्त्याला भेगा पडण्यास सुरुवात होते आणि रस्ता फुटू शकतो. याचा त्रास भविष्यात स्थानिक आणि पर्यटकांना होणार आहे.>रस्ता मजबूत करण्यासाठी लागणाºया साहित्याचा उपयोग नाहीप्राधिकरणने रस्त्याचे आरसीसी काँक्रिटचे काम मजबूत व्हावे, यासाठी सिमेंट ओतल्यानंतर लोखंडी सळई यांच्यात तसेच जमिनीत सिमेंट पोहोचावे, यासाठी व्हायब्रेटरचा एकदाही वापर केला गेला नाही. यामुळे रेडीमिक्स सिमेंट हे शेवटच्या थरापर्यंत पोहोचण्यास मदत होते. त्याच वेळी रस्त्यावर कोणताही काँक्रिटचा भाग एका रेषेत राहावा, असा प्रयत्न असतो. रस्त्याचा भाग कुठेही बाजूला जाऊ नये, यासाठी रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना दोन्ही बाजूला लोखंडी प्लेट लावून आणि त्याला नटबोल्ड लावून मजबूत करण्यात येते. जेणेकरून संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना ते अखंड आणि एकसंघ व्हावे, अशी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणची अपेक्षा आहे. आतापर्यंत एकदाही या दोन्ही प्रणालींचा वापर जिल्हा परिषदेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून झालेला नाही.रस्त्याचे काम करताना ब्रेकर आणि लोखंडी प्लेट नटबोल्ट लावून मजबूतपणे बांधून ठेवल्या नसल्याने काही महिन्यांपूर्वी झालेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. सध्या गावातून केवळ हलकी वाहने ये-जा करीत आहेत. पूर्ण रस्ता वाहतुकीस खुला झाल्यानंतर अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्यानंतर त्या भेगा पडलेल्या रस्त्याची काय अवस्था होईल, याचा विचार करून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आपले भरारी पथक पाठवून पाहून घ्यावे.- सनी चंचे, सदस्य नेरळ ग्रामपंचायतआम्ही ठेकेदार कंपनीला रस्त्याचे काम नियमानुसार करण्याची सूचना केली आहे. ब्रेकर आणि लोखंडी प्लेट नटबोल्ट यांचा वापर मजबूत रस्ते होण्यासाठी होत नसेल, तर त्याची दखल जिल्हा परिषद घेईल.- एस. ए. केदा, उपअभियंता, रायगड जिल्हा परिषद