शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आमसभेत नागरिक आक्रमक

By admin | Updated: January 8, 2016 02:09 IST

मागील वर्षाची आमसभा बरखास्त झाली होती. या आधी आठ दहा वर्षे संबंधित आमदारांची आमसभा झालीच नाही. त्यामुळे जनतेचे विविध महत्वाचे प्रश्न

रोहा : मागील वर्षाची आमसभा बरखास्त झाली होती. या आधी आठ दहा वर्षे संबंधित आमदारांची आमसभा झालीच नाही. त्यामुळे जनतेचे विविध महत्वाचे प्रश्न प्रलंबित होते. काही विकासकामे अर्धवट, निकृष्ट होते. याकडे संबंधित तीनही आमदार गांभीर्याने लक्ष देत नव्हते.तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाई, निकृष्ट पाणी योजना, खराब रस्ते, वीज प्रश्न यासह मुख्यत: रोहा, वरसेत अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली. या सर्वच गंभीर विषयांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पंचायत समिती कार्यालयात आमसभा झाली. त्या सभेत तालुका ठिकठिकाणचे नागरिक कमालीचे आक्रमक झाले. प्रचंड गडबड गोंधळ करीत संबंधित सर्वच प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. सभेत पाणी, रस्ते, अनधिकृत बांधकामे, वीज प्रश्नांवर खडाजंगी चर्चा झाली. त्या संबंधित काही अधिकाऱ्यांची नागरिकांना उत्तरे देताना अक्षरश: दमछाक झाली. त्यातच अखेर आ. पंडित पाटील, आ. अवधूत तटकरे मध्ये उठून गेल्याने सभेचे अध्यक्ष आ. धैर्यशील पाटील यांनी सामंजस्यपणे लोक प्रश्नांवर चर्चा घडवून आणली.रोहा पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवारी आमसभा वादळी झाली. या सभेला आ. धैर्यशील पाटील, आ. पंडित पाटील, आ. अवधूत तटकरे उपस्थित होते. व्यासपीठावर सभापती लक्ष्मण महाले, तहसिलदार उर्मिला पाटील, मुख्याधिकारी प्रकाश पाटील, पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधी आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते. ठेकेदार व अधिकारी परस्पर कामे ठरवतात. हे यापुढे चालणार नाही, असा सज्जड दम आ. धैर्यशील पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला. यावेळी वीज प्रश्नावर अनेकांनी गदारोळ केला. आमसभेत काही प्रश्नांवर प्रचंड गदारोळ झाला. (वार्ताहर)