शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

इकोफ्रेंडली होळीचा सण साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 00:48 IST

वनविभागाचे आवाहन : मोटारसायकल रॅली काढून के ली जनजागृती

पेण : फाल्गुन मासाचा प्रारंभ २४ फेब्रुवारीपासून होत असून, यानंतर वेध लागतात ते होळी सणाचे. पेण वनविभागाने पर्यावरण पूरक, इकोफ्रेंडली होळीचा सण साजरा करण्याचे जनतेला आवाहन केले आहे. यासाठी वनविभागाच्या वतीने मोटारसायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली आहे.

यासाठी पेण वनविभागाचे वनक्षेत्रपाल गायकवाड यांनी जनजागृतीवर भर देण्यासाठी कंबर कसली असून, पेण शहरात वनपाल, वनरक्षकांनी मोटारसायकल रॅली काढून इकोफ्रेंडली होळीचा सण साजरा करण्याचे जनतेला आवाहन केले. फाल्गुन महिना उजाडला की गावाच्या वेशीवर सात दिवस होळी पेटवली जाते. गावातील लहान मुलांचा हा खेळ सुरू असतो. यासाठी झाडांच्या फांद्या तोडून त्याची होळी बनवून पेटवली जाते. सोमवार, ९ मार्च रोजी हुताशनी पौर्णिमा अर्थात होळीचा सण साजरा होणार असल्याने आधीच फाल्गुन मास त्यात वृक्षतोडीचा उल्हास हा असुरी आनंद पर्यावरणाला घातक ठरणारा आहे. यामुळे जागतिक तापमानवाढ व नैसर्गिक आपत्तीचा सामना आज जगातील घडलेल्या अनेक घटनांनी दिसून आला आहे. सच्चे वृक्षप्रेमी बनून निसर्ग संतुलन राखण्यासाठी वृक्षतोड न करता इकोफ्रेंडली होळीचा सण साजरा करावा, असा संदेश देत चौकाचौकांत जाहीर आवाहन करण्यात आले.येत्या १५ दिवसांत प्रत्येक विभागात ही जनजागृती ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन इकोफ्रेंडली होळीचा सण साजरा करण्याचे जनतेला आवाहन करण्यावर पेण वनविभागाची मोहीम सुरू राहणार आहे. वृक्षतोड करताना कोणतीही व्यक्ती आढळून आल्यास भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही वनविभागाकडून सांगण्यात आले. सुकी लाकडे, पालापाचोळा, भाताचा पेंढा, केळीच्या पानांचा वापर, शेणाच्या गोवऱ्या यांचा वापर पर्यावरणपूरक होळी उभारण्यासाठी करावा. सण साजरे करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची प्रत्येक नागरिकाने दक्षता घेत होळी सणाचा आनंद साजरा करावा. 

टॅग्स :Raigadरायगड