शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मानांकनामुळे सीईटीपीची जबाबदारी वाढली

By admin | Updated: February 23, 2016 02:09 IST

महाड औद्योगिक क्षेत्रातील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची गुणवत्ता, आरोग्य, पर्यावरण व सुरक्षा नियोजन प्रणालीतील सुसूत्रतेमुळे मिळालेल्या आयएमएस या आंतरराष्ट्रीय मानांकनामुळे

महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची गुणवत्ता, आरोग्य, पर्यावरण व सुरक्षा नियोजन प्रणालीतील सुसूत्रतेमुळे मिळालेल्या आयएमएस या आंतरराष्ट्रीय मानांकनामुळे या प्रक्रिया केंद्राची तसेच येथील कारखानदारांची जबाबदारी आता वाढली आहे. यापुढेही या सीईटीपीने नियोजन प्रणालीचे सातत्य कायम ठेवावे, अशी अपेक्षा सीएमडी आयपीएस प्रा.लि.चे चेअरमन सुंदर कटारिया यांनी व्यक्त केली.महाडच्या सामायिक सांडपाणी केंद्राला आयएमएस नामांकन प्रमाणपत्र सोमवारी प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित केलेल्या सोहळ््याप्रसंगी कटारिया बोलत होते. हे आंतरराष्ट्रीय मानांकन मिळविणारा महाडचा हा सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र देशातील दुसरा, तर महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प ठरला. हे अत्यंत अभिमानास्पद असल्याचेही कटारिया यांनी स्पष्ट करून केंद्राच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. या केंद्राच्या प्रणालीचे काम असेच कायम सुरू राहिले, तर हे प्रक्रिया केंद्र जागतिक स्तरावरही आदर्श ठरेल, असा विश्वास कटारिया यांनी व्यक्त केला. एमएमए सीईटीपीचे अध्यक्ष एस. बी. पठारे यांनी महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांसह सर्वांनी घटकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळेच आपल्या सीईपीटीला आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाल्याचा हा सुवर्णक्षण पाहायला मिळाला, असे सांगितले. या मानांकनामुळे महाड औद्योगिक क्षेत्राची आता नवी ओळख निर्माण झाली असून, सामाजिक बांधिलकीतूनच आपण व आपल्या सहकाऱ्यांनी केलेल्या सामायिक परिश्रमाचे हे यश असल्याचेही पठारे यांनी सांगितले. यावेळी एसएमएचे माजी अध्यक्ष सुरेश भोसले, तहसीलदार संदीप कदम, आॅडिटर सचिन बिरवाडकर, डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, जिते ग्रामपंचायत सरपंच संजय कचरे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी एस. आर. औटी, डॉ. रमेश नाईक आदी उपस्थित होते.