शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांनाच उमेदवारीची संधी !

By admin | Updated: November 7, 2016 02:53 IST

येथील ‘क’ वर्ग नगरपरिषदेत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रमुख पक्षांनी कंबर कसली असून अद्याप साध्या प्रचाराला सुरु वात झालेली दिसत आहे

माथेरान : येथील ‘क’ वर्ग नगरपरिषदेत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रमुख पक्षांनी कंबर कसली असून अद्याप साध्या प्रचाराला सुरु वात झालेली दिसत आहे. यावेळी अनेकांनी पक्षबदल केल्यामुळे पक्षप्रमुखांनी नवोदित तसेच पक्ष प्रवेशधारकांना आणि जे अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत, तसेच ऐन निवडणुकीच्या वेळीच पक्ष प्रमुखांना वेठीस धरतात अशाही महाभागांना उमेदवारी देताना विचारपूर्वक निर्णय घेऊनच आपापल्या प्रभागात जर लढवय्ये उमेदवार नसले तरीसुद्धा पक्षात आल्याने त्यांना नाराज न करता सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाच सर्वच पक्षप्रमुखांनी उमेदवारी बहाल केली आहे.आगामी निवडणूक ही जरी खर्चीक असली तरीसुद्धा अनेक जण हे केवळ उमेदवारी मिळविण्यात यशस्वीही झालेले दिसत आहेत. काही जणांकडे खिशात छदाम नसताना सुद्धा गावाच्या विकासाची इच्छा असल्याने अनेकजण निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. कुणा एका प्रमुख पक्षाच्या उमेदवाराची दहा ते पंधरा मते आपल्याच पारड्यात पाडून जो खऱ्या अर्थाने गावाचा विकास करण्यास कटिबद्ध आहे, अशांना उमेदवारांमुळे वेळप्रसंगी पराभवाची धूळ चाखावी लागणार आहे. ‘एक गाव बारा भानगडी’ अशीच अवस्था या लहानशा गावात पहावयास मिळत आहे. एकूण आठ प्रभाग असलेल्या माथेरानमध्ये संपूर्ण मतदार संख्या साडेतीन हजारांच्या आसपास आहे. प्रत्येक प्रभागात पाचशेच्या आत मतदार संख्या आहे. परंतु नगर परिषदेच्या सभागृहात आपणच विराजमान व्हायला हवे अशी दिवसाढवळ्या स्वप्ने पाहणारी उमेदवार मंडळी नाहक सक्रि य उमेदवारास अडचण ठरणार आहेत. काही जण उमेदवारी माघारीची तारीख ११ नोव्हेंबर असल्याने तेव्हा कदाचित चिरीमिरी रकमेसाठी माघार घेतील असे चित्र सुद्धा स्पष्ट दिसत आहे. १२ नोव्हेंबरनंतरच प्रचाराला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे.या निवडणुकीत बहुतांश नवोदित उमेदवारांचा भरणा अधिक असल्याने ‘दामच करेल काम’ अशीच परिस्थिती १२ नोव्हेंबरनंतर दिसणार आहे. कारण येथील ठरावीक सुज्ञ मतदार वगळता अन्य मतदारांना गावाच्या विकासाबाबतीत काहीच स्वारस्य नाही. (वार्ताहर)