शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

आॅरेंज स्मार्ट सिटी प्रकल्प जनसुनावणी रद्द करा

By admin | Updated: July 9, 2017 02:04 IST

आॅरेज स्मार्ट सिटी लि. या कंपनीच्या मार्फत औद्योगिक वसाहत उभारण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी)वतीने मंगळवार,

- जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : आॅरेज स्मार्ट सिटी लि. या कंपनीच्या मार्फत औद्योगिक वसाहत उभारण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी)वतीने मंगळवार, ११ जुलै रोजी आयोजित केलेली पर्यावरणविषयक जनसुनावणी रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व आदिवासींच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी रायगडचे जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर यांच्याकडे केली आहे. याबाबत सोमवारी निर्णय देण्यात येणार असल्याचे मलिकनेर यांनी सांगितले. पेण तालुक्यातील १२ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून ही औद्योगिक वसाहत उभारण्याचे प्रयोजन आहे. त्याकरिताची ही पर्यावरण विषयक जनसुनावणी नेमकी कुठे आहे? याची माहिती देण्यात आलेली नाही, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा(एमपीसीबी)कडून देण्यात आलेले दस्तावेज व अहवाल पूर्णपणे इंग्रजीमध्ये असल्याने ग्रामस्थ व विशेषत: आदिवासी बांधवांकरिता अनाकलनीय आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या भात लावण्यांचा हंगाम सुरू असल्याने शेतातील कामे टाकून सुनावणीकरिता येणे शेतकऱ्यांना केवळ अशक्य असल्याचे पाटील यांनी या वेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी मलिकनेर यांच्या निदर्शनास आणून दिले.पेण तालुक्यातील बळवली, गोविर्ले, आंबेघर, शेणे, विराणी, बोरगाव, कोपर, आंबिवली, हमरापूर, मुंगोशी, पडाले, बेलकडे या बारा गावांतील जागेवर, आॅरेंज स्मार्ट सिटी इन लि. या कंपनीच्या मार्फत औद्योगिक वसाहत उभारणे प्रस्तावित आहे. त्यामुळे ५ हजार ९५० आदिवासी बांधव बाधित होऊन विस्थापित होऊ शकतात. प्रकल्पाची पर्यावरणविषयक जनसुनावणी मंगळवार, ११ जुलै २०१७ रोजी आयोजित केली असल्याचे पत्र अदिवासी व ग्रामस्थांना २२ जून २०१७ रोजी कंपनीच्या प्रतिनिधीमार्फत देण्यात आले आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) लेअरहेडवरील उप प्रादेशिक अधिकारी रायगड यांच्या सहीचे पत्रक ग्रामपंचायतींच्या शिपायाकडे सुपूर्त केले. त्यावर ग्रामपंचायतीचा शिक्का अथवा सरपंच, ग्रामसेवक यांची पोचही सगळ्या ग्रामपंचायतीतून घेण्याची तसदी कंपनी वा एमपीसीबीने घेतलेली नसल्याचे कार्यकर्ते संजय डंगर यांनी सांगितले.पावसात पर्यावरण सुनावणी ठेवून ती उरकण्याचा घाटजुलै महिना हा भात लावणीचा हंगाम आहे. रायगड जिल्ह्यात जून ते नोव्हेंबर हा कालावधी अतिवृष्टी, पूर, आपत्ती तसेच शेतीच्या हंगामामुळे ग्रामीण शेतकरी व आदिवासींसाठी व्यस्त कालावधी आहे. या भर पावसाच्या कालावधीत जनसुनावणी आयोजित करणे म्हणजे एक घाई गडबडीत शासकीय औपचारिकता पूर्ण करुन सुनावणी उरकण्याचा हा घाट आहे. शेतकऱ्यांना वा बाधित प्रकल्पग्रस्तांना अंधारात ठेवून पर्यावरणाच्या ना हरकत दाखल्याची प्रक्रिया पूर्ण करून घेणे, असा स्पष्ट हेतू दिसतो. पर्यावरण जनसुनावणीचे पीठासीन अधिकारी तसेच रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून ही प्रक्रिया सजग व निपक्षपाती पार पाडावी ही अपेक्षा आहे. परिणामी, ही घाईतील ११ जुलै २०१७ रोजी आयोजित सुनावणी रद्द करावी, अशी मागणी केली आहे.आदिवासींच्या हाती ४९४ पानी इंग्रजीतील अहवालप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उप प्रादेशिक अधिकाऱ्यांंच्या पत्रासोबत, ‘ड्राफ्ट ईआयए रिपोर्ट आॅफ आॅरेंज स्मार्ट सिटी’ हा ४९४ पानांचा इंग्रजीमधील अहवाल, ‘व्हॉल्यूम २ अनेक्चर टू द ईआयए रिपोर्ट आॅफ आॅरेंज स्मार्ट सिटी’हासुद्धा इंग्रजीमधील ४५० पानांचा संच,‘एक्झिकेटिव्ह समरी आॅफ इन्व्हीरॉनमेंट इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट’ तोही ४४ पानांचा इंग्रजीतील अहवाल, कार्यकारी सारांश पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अहवाल एकूण ४३ पानांचा त्रोटक अहवाल असे दस्तावेज देण्यात आले असल्याचे मुंगोशी ग्रामपंचायत सदस्य हरिष पाटील यांनी सांगितले.अहवाल स्थानिक भाषेत देणे बंधनकारकसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यावरण खात्याने वेळोवेळी काढलेल्या शासकीय निर्णयांनुसार प्रकल्पग्रस्तांना पर्यावरण मूल्यांकन आघात अहवाल स्थानिक भाषेत संपूर्ण भाषांतरित करून मिळणे हा अधिकार आहे; परंतु आॅरेंज स्मार्ट सिटी इन. लि. या कंपनीमार्फत प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केलेला अहवाल,काही ग्रामपंचायतींना २२ जूनला तर काही ग्रामपंचायतींना ३० जूनला मिळाला. यामध्ये फक्त कार्यकारी सारांश मराठीत आहे. उर्वरित सर्व अहवाल इंग्रजीमध्ये आहेत.