शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोटी किनारी, महाकाय लाटांचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 04:14 IST

३ आॅगस्टपासून जोरदार वारे तेही ताशी ६० किलोमीटरच्या वेगाने वाहू लागल्याने समुद्रात गेलेल्या बोटी पाण्यावर टिकावच धरू शकत नसल्याने पुन्हा किनारी परतल्या आहेत.

- संजय करडेमुरु ड जंजिरा : १ जून ते ३१ जुलै मासेमारी करण्यास बंदी असल्यामुळे सर्व बोटी किनाºयावरच होत्या; परंतु १ आॅगस्टपासून मासेमारीला सुरुवात झाली. मात्र, ३ आॅगस्टपासून जोरदार वारे तेही ताशी ६० किलोमीटरच्या वेगाने वाहू लागल्याने समुद्रात गेलेल्या बोटी पाण्यावर टिकावच धरू शकत नसल्याने पुन्हा किनारी परतल्या आहेत. आधीच दोन महिने मासेमारीबंदी आणि आता समुद्र खवळल्याने बोटी किनारी लागल्याने मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.मुरु ड तालुक्यातील मुरु ड शहर, एकदरा, आगरदांडा, दिघी या भागांची पाहणी केली असता, बहुसंख्य बोटी किनाºयाला लागल्या असून, वाºयाचा वेग कमी होण्याची प्रतीक्षा मच्छीमार करीत आहेत. मुरु ड तालुक्यात छोट्या व मोठ्या बोटींची संख्या ६५० आहे, तर इतर बंदरातूनसुद्धा आलेल्या बोटी या आगरदांडा व दिघी बंदरात नांगरण्यात येतात.खोल समुद्रात तशी ५५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू लागल्याने तातडीने जिथे किनारा जवळ असेल अशा ठिकाणी आम्ही बोटी लावल्या व स्वत:चे व बोटीचे संरक्षण केल्याचे कैलास कोटकर व संदीप श्रीवर्धनकर यांनी सांगितले. वाºयाचा वेग जास्त असल्याने समुद्रात टाकलेले जाळे हे आपोआप गुंडाळले गेल्याने ते बोटीवर खेचताना खूप ताकद लावावी लागली. तर काही ठिकाणी जाळे खेचता येत नसल्याने अखेर कापावे लागल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागल्याचे मच्छीमार सांगतात.सध्या आगरदांडा बंदरात हर्णे, मुरुड व रत्नागिरी येथील बोटी तर दिघी बंदरात डहाणू, सातपाटी, पालघर आदी ठिकाणच्या बोटी शाकारण्यात आल्या आहेत. यामुळे बंदरात बोटींची संख्या जास्त दिसून येत आहे. ३ आॅगस्टपासून वाहणारे जोरदार वारे अद्यापपर्यंत शांत झालेले नाहीत, त्यामुळे बोटी किनाºयावर आहेत. आर्थिक नुकसान होत असल्याने शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी मच्छीमारांकडून करण्यात येत आहे.सिमेंट काँक्रीटचे बंधारेही तुटलेजोरदार वाºयांचा परिणाम किनारीभागालाही बसला आहे. मुरु ड समुद्रकिनारी असणारी सुरु ची बाग भरतीच्या लाटांमुळे, पाणी किनारी घुसल्याने उन्मळून पडली आहे.जोरदार लाटांच्या धडकेमुळे सिमेंट काँक्र ीटचे बंधारेसुद्धा तुटले असून लहान जेटींचे नुकसान झाले आहे. दक्षिणेकडून येणाºया वाºयाचा वेग अधिक असल्याने बोटींचेही नुकसान होत आहे.ताशी ६० कि.मी. वाहणाºया सुसाट वाºयामुळे होड्यांचे तसेच मासेमारीच्या जाळ्यांचेही नुकसान होत आहे. जाळी एकमेकांत गुंतत असल्याने समुद्रातच तोडून परतावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या