शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये भात कापणीला सुरुवात

By admin | Updated: October 24, 2016 02:48 IST

प्रतिवर्षी भात कापणी सुरू असतानाच अवेळी पाऊस आपला रंग दाखवतो, यामुळे उभ्या भातपिकांवर पाणी फिरते. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी महाड तालुक्यात शेतकऱ्यांनी

दासगाव : प्रतिवर्षी भात कापणी सुरू असतानाच अवेळी पाऊस आपला रंग दाखवतो, यामुळे उभ्या भातपिकांवर पाणी फिरते. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी महाड तालुक्यात शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरु वात केलीआहे. तालुक्यातील बहुतांशी भागात भात कापणीला वेग आलेला दिसून येत आहे.महाड तालुक्याला सुरुवातीपासूनच पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. यंदाच्या वर्षी दोन वेळा महाड तालुक्याला पुराचा चांगलाच फटका बसला. अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. काही प्रमाणात लागवड झालेली शेती या पुराच्या पाण्यामुळे धुपून गेली. महाड तालुक्यामध्ये ४० टक्के शेती ही हळव्या भातांची केली जाते. हे भात गौरी- गणपतीच्या सणामध्ये तयार होण्यास सुरुवात होते, तर दसऱ्याच्या मुहूर्तावर याची कापणी होते. यंदा दसऱ्यामध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. महाड तालुक्यामध्ये या लागणाऱ्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तयार झालेले भात पीक जमीनदोस्त झाली. अनेक शेतकऱ्यांनी आहे त्या भाताची कापणी सुरू केली आहे. मात्र पुन्हा अवेळी पावसाच्या भीतीने शेतकरीवर्ग चिंतेमध्ये आहे. १० ते १२ दिवसांच्या या पावसाच्या विश्रांतीमुळे महाड तालुक्यात शेतकऱ्यांची मोठ्या जोराने हळवी भाताची शेती कापणीस जरी सुरुवात केली असली तरी आजही या शेतकऱ्यांसमोर अवेळी पावसाच्या भीती व्यतिरिक्त शेतीमध्ये आजही तुंबलेले पाणी, कापणीनंतर भात सुकवणीचा प्रश्न तसेच मजुरांचा प्रश्न कायम आहेत. सध्या शेतकरी भात पीक येवून देखील पुन्हा पावसामुळे अडचणीतच आहे. तालुक्याच्या अनेक ठिकाणी भात कापणी सुरू आहे. शेतातील पाण्याचा विचार न करता शेतीची कापणी करून शेताच्या बांधावर कापलेले भात सुकवण्याचे काम सुरू आहे. तर मिळेल ते मजूर तर मिळेल त्या वाहनांनी कापलेला भात शेतकरी घरी नेण्यात मग्न आहेत. काही ठिकाणी आजही शेतामध्ये एवढे पाणी आहे की कापणी करू शकत नाही, यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अवेळी पावसामुळे दरवर्षी भात पिकाचे नुकसान होत असले तरी शासकीय नियमामध्ये पावसाचे प्रमाण बसत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापलेले भात पीक सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. (वार्ताहर)