शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

बँक ग्राहकांचा तिसरा दिवसही रांगेतच

By admin | Updated: November 13, 2016 01:19 IST

जुन्या नोटा चलनातून बंद केल्याने जनसामान्यांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली आहे. रोह्यात सर्वच बँकावर गर्दी असून लांबच लांब रांगांमध्ये खातेदारासह ग्राहकांना

धाटाव : जुन्या नोटा चलनातून बंद केल्याने जनसामान्यांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली आहे. रोह्यात सर्वच बँकावर गर्दी असून लांबच लांब रांगांमध्ये खातेदारासह ग्राहकांना तासन्तास उभे राहवे लागत आहे. नोटा बंद झाल्यापासून तिसऱ्या दिवशी, शनिवारीही ग्राहक मोठ्या संख्येने रांगेत उभे दिसले. परिसरातील एटीएम अद्याप सुरू न झाल्याने खातेदारही प्रतीक्षेत आहेत. जुन्या नोटा बदलण्यासाठी खातेदारांसह ग्राहकांमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुणवर्गाचा सहभाग अधिक असून सुट्या पैशांच्या कमतरतेमुळे पैसे बदलून मिळण्यास विलंब लागत आहे.बँकेतील इतर सेवांकरिता नेट नसल्यामुळे व्यवहारात खंड पडत आहे. पैसा नसल्याने अनेकांनी वीकएण्डला बाहेरगावी जाणे टाळले आहे. दोन-चार दिवसांत बँकामधील गर्दी कमी होईल, असे रोह्यातील एका बँकेच्या व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले असले तरी कामगारवर्गाला याचा मोठा फटका बसला आहे. आर्थिक व्यवहार ठंडावल्याने बाजारातील दुकाने ओस पडली आहेत. एटीएम सेवा सुरू केल्यास थोडीफार गैरसोय दूर होईल, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. नोटा बदलण्यासाठी बँकेबाहेर गर्दीतळे : नोटा बदलून घेण्यासाठी तिसऱ्या दिवशीही बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक, पोस्ट आॅफिस बाहेर नागरिकांनी एकच गर्दी केलेली पाहावयास मिळत आहे. दैनंदिन व्यवहार कसे करावयाचे हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे. नागरिकांकडे सुटे पैसे १००/५० रु. नोटाच नसल्यामुळे दैनंदिन व्यवहार करणे कठीण झाल्याची प्रतिक्रिया मनोज वाढवळ व महेंद्र बिरवाडकर या नागरिकांनी दिली. एसटीने प्रवास करावयाचा म्हटले तरी ग्रामीण भागातील नागरिकांकडे सुटे पैसे नाहीत. बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या ग्रामस्थांची संख्याही घटली आहे. शहरात तीन दिवसांपासून एटीएम सेवा बंद असल्यामुळे बहुतांश आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. पैसे असूनही बजेट कोलमडल्याची गृहिणींची स्थिती झाल्याची प्रतिक्रिया सुजाता पवार यांनी दिली आहे. ग्रामीण भागातील अनेक महिलांना बँक व्यवहाराबाबत पुरेशी माहिती नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. पैसे काढण्यापेक्षा अधिक वेळ पैसे जमा करण्यास लागत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.