शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय सर्वेक्षण : युवक-युवतींची मतदार नोंदणीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 02:15 IST

शासकीय सर्वेक्षण : जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील १ लाख जणांचे यादीत नाव नाही

अलिबाग : रायगड जिल्ह्यात निवडणूक विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या मतदार नोंदणी अभियानाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. शासकीय सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील जवळपास १ लाख युवक-युवतींनी आपली मतदार यादीत नोंदणी केलेली नाही. दुसरीकडे स्थलांतरित मतदार आपली मतदार यादीतील नावे वगळण्यास इच्छुक नसल्याचेही निदर्शनास आले आहे.

रायगड जिल्ह्यात २३ लाख ७०१ मतदारांमध्ये अपंग मतदारांची संख्या ८ हजार ७८९ इतकी आहे. १८ ते १९ वयोगटातील २८ हजार ५७४ मतदार आहेत तर २० ते २९ वयोगटातील मतदारांची संख्या ४ लाख ३४ हजार ७८७ इतकी आहे. निवडणूक विभागाकडून मतदार नोंदणी वाढविण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. जनजागृती मोहीम राबविली जाते. युवा मतदारांचे प्रमाण वाढविण्यासाठी शाळा तसेच महाविद्यालय स्तरावर निवडणूक साक्षरता क्लब, चुनाव पाठशाळा स्थापन केली आहे. शिवाय मतदार नोंदणी साक्षरता दिंडी काढली जाते.

महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्यासाठी स्वीपसारखा कार्यक्रम राबविला जातो. परंतु जिल्ह्यात नवमतदार नोंदणीला मिळणारा प्रतिसाद खूपच कमी आहे. निवडणूक विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात जवळपास १ लाख नवीन मतदार आहेत. त्यातील किमान ५४ हजार मतदारांची नोंदणी होणे अपेक्षित आहे; परंतु तसा प्रतिसाद मिळत नाही. दुसरीकडे स्थलांतरित मतदार आपली नावे स्वतःहून मतदार यादीतून कमी करीत नाहीत. पूर्वी ही नावे संबंधित अधिकारी कमी करीत असत; परंतु आता ते अधिकार कमी करण्यात आले आहेत. अशा मतदारांची यादी राज्य निवडणूक आयोगाला पाठविली जाते. 

मतदार याद्यांच्या पुनर्रीक्षण मोहिमेचा कार्यक्रम सुरू झाला आहे. मतदार याद्या अद्ययावत, अचूक व्हाव्यात तसेच जास्तीतजास्त पात्र मतदारांची नावे मतदार यादीत यावीत, यासाठी सर्व शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. नागरिकांनीदेखील यात सहकार्य करावे. आपली तसेच आपल्या नातेवाइकांची नावे यादीत योग्य पद्धतीने नोंदविली गेली आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.- निधी चौधरी, जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड

रायगडमध्ये आता मतदार याद्यांचे पुनर्रीक्षण करण्यात येत आहे. यात नवीन मतदार नोंदणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार१ जानेवारी २०२१ रोजी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झालेले असेल अशा व्यक्तींना मतदार यादीत आपले नाव नोंदविता येणार आहे. त्यानुसार जुनी मतदार यादी १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

१५ डिसेंबरपर्यंत या यादीवरील दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. नवीन मतदार नोंदणी किंवा नावे वगळणे, दुबार नावे कमी करणे, पत्ता बदलणे यासाठी ५ व ६ डिसेंबर तसेच १२ व १३ डिसेंबर रोजी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. १४ जानेवारीपर्यंत यादीची तपासणी, अद्ययावतीकरण, छपाई करून १५ जानेवारीपर्यंत अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

 

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग