शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

आगरी भाषा जतन करण्याचे प्रयत्न आवश्यक

By admin | Updated: February 17, 2017 02:15 IST

आगरी माणसाची संस्कृती, त्यांच्या परंपरा, त्यांचा लढाऊ बाणा, त्यांची कलात्मकता सारे काही कोकणाशी नाते सांगणारे असल्याने

अलिबाग : आगरी माणसाची संस्कृती, त्यांच्या परंपरा, त्यांचा लढाऊ बाणा, त्यांची कलात्मकता सारे काही कोकणाशी नाते सांगणारे असल्याने ठाणे, मुंबई व रायगड या तीन जिल्ह्यात वस्ती करून राहिलेला आगरी माणूस हा इथला भूमिपुत्र आहे. तरुणांनी जुनी संस्कृती जपली पाहिजे, आगरी भाषा दिवसेंदिवस लोप पावत आहे, ती जतन करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत, असे प्रतिपादन आगरी बोली अभ्यासक व लेखक तथा आगरी कोषकार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पी.एन.पी. महाविद्यालयाच्या मराठी विभाग आणि वाङ्मय मंडळाच्या वतीने तीन दिवसांच्या आगरी बोली परिचय प्रमाणपत्र परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, वेगळेपण जपणारा आगरी समाज सर्व ठिकाणी विखुरलेला आहे. आगरी समाज आगरीपध्दतीच्या जेवणासाठी खूप प्रसिद्ध आहे. आगरी तरु णांनी जुनी संस्कृती जपली पाहिजे. समाजाशी विद्यार्थ्यांना जोडण्याचे काम पीएनपी संस्था करत असते. आगरी समाजाने लग्न समारंभासाठी कर्जबाजारी होऊन थाटामाटात मुलांचा लग्न सोहळा करू नये, तसेच हळदी समारंभाला दारू, मटण ही आपली संस्कृती नाही. पैशाचा विनियोग चांगल्या प्रकारे करावा आणि चांगली प्रथा आगरी समाजात सुरू व्हावी असे नमूद केले. याप्रसंगी डॉ. अनिल बांगर, डॉ. गणेश अग्निहोत्री, संजीवनी नाईक, कैलास पिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.आगरी बोली परिचय प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. मराठी भाषेचा उगम, मराठी भाषेतील विविध बोली, आगरी बोली, उगम, इतिहास, परिचय, व्याकरण, सांस्कृतिक संदर्भ, आगरी लोकसाहित्य, आगरी साहित्य आणि साहित्यिक अशा विशेष अभ्यासक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन वाङ्मय समिती प्रमुख प्रा. डॉ. ओमकार पोटे यांनी तर आभार मराठी विभागप्रमुख प्रा. नम्रता पाटील यांनी मानले. या वेळी आगरी बोली संशोधक प्रा. डॉ. अनिल बांगर, पीएनपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, आगरी लेखक कैलास पिंगळे, उपप्राचार्या संजीवनी नाईक, मराठी विभाग प्रमुख नम्रता पाटील, वाङ्मय मंडळाचे प्रमुख डॉ. ओमकार पोटे आदी मान्यवर उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)