शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:37 IST

कामाला सुरुवात : गंधारपले महामार्ग वाहतूक शाखा पोलीस पावसाळ्यासाठी सज्ज

दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यापुढे कोकणातील महामार्ग सुरळीत राहावा यासाठी महामार्ग वाहतूक पोलीस शाखा गंधारपले हे सज्ज झाले आहेत. पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. महामार्गावर विविध कामांना सुरुवात करण्यात आली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसºया टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. दोन वर्षे झाली तरी अद्याप काम पूर्ण झाले नाही. यंदा बहुतेक काम पूर्ण होण्याची शक्यता असताना कोरोनामुळे गेले तीन महिने काम ठप्प झाले होते. सध्या काम सुरू असले तरी पावसाने हजेरी लावली आहे. तर कोरोनाच्या भीतीने मजूर आपल्या गावी गेला आहे. सध्या तरी इंदापूर ते पोलादपूर या टप्प्यातील मोठ्या प्रमाणात काम शिल्लक आहे. ज्या ठिकाणी महामार्गाचे काही प्रमाणात काम झाले आहे अशा अनेक ठिकाणी सुरुवातीच्या पावसातच अडथळे निर्माण झाले आहेत. चक्रीवादळामुळेदेखील महामार्गावर झाड कोसळून अडथळे निर्माण झाले. सध्याच्या परिस्थितीत महामार्गाचे सुरू असलेले महाड तालुक्यातील केंबुर्ली गाव हद्दीतील आणि नडगाव हद्दीतील कामे महामार्गाच्या वाहतुकीला मोठे अडथळे निर्माण करणारी आहेत. तसेच वहूर हद्दीमध्ये महामार्गावरच मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. हे अडथळे चार दिवसांत दूर झाले नाहीत तर पावसाळ्यात महामार्ग बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे अनेक अडथळे महामार्ग वाहतूक पोलीस शाखा गंधारपले यांच्या समोर यंदाच्या पावसामध्ये आव्हानात्मक उभे राहिले आहेत. नडगाव या ठिकाणच्या पुलाचे काम सुरू आहे. मात्र, तो लवकर व्हावा यासाठीदेखील महामार्ग पोलीस ठेकेदार कंपनीकडे पाठपुरावा करत आहे.चक्रीवादळात पडलेले झाड दहा मिनिटांत के ले बाजूला१पुढे येणाºया पावसाळ्यात अनेक प्रसंगांना तोंड देण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलीस शाखा गंधारपले यांनी कंबर कसली असून जेसीबी, झाडांना कापण्यासाठी कटर, रुग्णवाहिका अशा अत्यावश्यक सुविधा सज्ज ठेवल्या असल्याची माहिती महामार्ग वाहतूक शाखा गंधारपलेचे पोलीस उपनिरीक्षक वाय. एम. गायकवाड यांनी दिली.२चक्रीवादळात माणगाव तालुक्यातील पाले या गाव हद्दीमध्ये महामार्गावरच मोठे झाड कोसळले मात्र, महामार्ग पोलिसांनी ते दहा मिनिटांत बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. सध्या यांच्या हद्दीत महामार्गालगत कोसळलेली झाडे साफ करण्याचे कामदेखील सुरू असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड