शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडमध्ये पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील

By admin | Updated: December 30, 2016 03:57 IST

आज देशाला परकीय चलन जर कोणत्या माध्यमातून मिळत असेल तर ते पर्यटनाच्या माध्यमातून मिळत आहे. देशाचा आर्थिक स्तर वाढवण्यासाठी परकीय चलन खूप

नांदगाव/ मुरु ड : आज देशाला परकीय चलन जर कोणत्या माध्यमातून मिळत असेल तर ते पर्यटनाच्या माध्यमातून मिळत आहे. देशाचा आर्थिक स्तर वाढवण्यासाठी परकीय चलन खूप महत्त्वाचे आहे. पर्यटन हे फार मोठे क्षेत्र असून गोवा राज्याला सर्वाधिक परकीय चलन पर्यटकांमुळे मिळत आहे. मुरु ड हे सुद्धा एक चांगले पर्यटन स्थळ असून याच्या विकासाची जबाबदारी शिवसेनेने घेतली असून लवकरच जास्तीत जास्त सुविधा राज्य सरकारमार्फत आम्ही मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, असे प्रतिपादन शिवसेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रकाश देसाई यांनी केले.नुकतेच मुरुड जंजिरा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून त्यांच्या हस्ते या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी देसाई बोलत होते. प्रकाश देसाई म्हणाले, मुरु ड समुद्रकिनारी लवकरच केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या माध्यमातून चेंजिंग रूम व स्वच्छतागृह होणार आहे. अन्य सुविधा सुद्धा विविध मंत्र्यांच्या मार्फत आम्ही मिळवून देऊ. लवकरच मुरु ड शहराला अंतर्गत रस्ते, विविध हॉटेल व्यावसायिकांसाठी असणाऱ्या सुविधा पुरविल्या जातील, असे ते यावेळी म्हणाले. मुरुड शहरात हिंदू-मुस्लीम एकोपा असून यापुढेही हा एकोपा असाच कायम राहील. मुरुड शहराला असणारे सांैदर्य हे अप्रतिम असून यामध्ये विकासकामांची भर देऊन या सौंदर्यात भर पाडण्याची आमची टीम निश्चित कार्यवाही करेल, असे ते म्हणाले.केदार जोशी म्हणाले की, कोकण हा सागरी किनारी वसलेला असून येथे मुळातच सृष्टीसांैदर्य आहे. येथे पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी सुरक्षितता, सोयी-सुविधा, स्वच्छता या गोष्टी पाळल्या तर भविष्य काळात बहुसंख्येने येथे पर्यटक येतील. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी पर्यटन महोत्सव यशस्वी करण्यासाठी शिक्षक तसेच नगरपरिषद कर्मचारीवृंद व स्थानिक नागरिक अथक परिश्रम घेऊन यशस्वी करत असतात. पर्यटकांना विविध कार्यक्र म पहाता यावे, पर्यटकांची संख्या वाढावी, स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी दरवर्षी पर्यटन महोत्सवाचे नियोजन करीत असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी अष्टविनायक मंडळाचे महड देवस्थानचे मुख्य ट्रस्टी केदार जोशी, नगराध्यक्षा स्नेहा पाटील, आमदार भरत गोगावले, तालुका प्रमुख नीलेश घाटवल, पर्यटन महोत्सवाचे कार्याध्यक्ष महेश भगत, माजी नगराध्यक्षा कल्पना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)