शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

‘कर्नाळा’च्या विकासासाठी प्रयत्नशील

By admin | Updated: March 3, 2016 02:42 IST

पनवेलला लागून असलेल्या माथेरान, कर्नाळा आणि भीमाशंकर या परिसराचा विकास करण्याकरिता शासन प्रयत्नशील आहे.

पनवेल : पनवेलला लागून असलेल्या माथेरान, कर्नाळा आणि भीमाशंकर या परिसराचा विकास करण्याकरिता शासन प्रयत्नशील आहे. वनासंदर्भातील कायदे अतिशय कडक आहेत. त्या कायद्याचे पालन करून कर्नाळा अभयारण्याचा विकास करण्यात येणार आहे. त्याचबरोबर माथेरान रोपवे व पनवेलहून भीमाशंकरला जाण्याकरिता मार्ग विकसित करण्यात येणार आहे. त्याकरिता शासन अनुकूल निर्णय घेणार असल्याची घोषणाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. पनवेल शहरातील मुख्य चार रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. एकूण ४३ कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या कामांचे भूमिपूजन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.या कामासाठी एमएमआरडीएने निधी दिला आहे. आगामी काळात पायाभूत सुविधांकरिता पनवेल शहराला निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली. ठाणा नाका, उरण नाका ते टपाल नाका, विश्राळी नाका या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. आ. प्रशांत ठाकूर या भागाच्या विकासाकरिता सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे आगामी काळात पनवेलकरिता निधीची कमरता पडून दिली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, महेश बालदी, भाजपाचे तालुकाध्यक्ष अरुण भगत, बांधकाम सभापती राजू सोनी, पाणीपुरवठा सभापती अनिल भगत, महिला व बालकल्याण सभापती सीता पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)