शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आर्चरीमध्ये आर्यनची आॅस्ट्रेलियात गरुडझेप

By admin | Updated: October 14, 2016 06:45 IST

आॅस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड फिल्ड आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत १८ देशातील ५५० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत उरणमधील १५ वर्षीय आर्यन पाटीलने

उरण : आॅस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड फिल्ड आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत १८ देशातील ५५० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत उरणमधील १५ वर्षीय आर्यन पाटीलने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. आता त्याचे लक्ष्य आॅलिम्पिंकमध्ये सहभागी होण्याचे असून, त्यासाठी त्याने कसून सरावात सुरुवात केली आहे. उरण तालुक्यातील जसखार गावात राहणारा आर्यन पाटील खारघर येथील इंटरनॅशनल फ्रुंडन्ट स्कूलमध्ये दहावीत शिकत आहे. आर्चरीची आवड असलेल्या आर्यनने तीन वर्षांपासून सराव आणि मेहनतीच्या जोरावर जिल्हा, राज्य आणि देश पातळीवरील आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून दर्जेदार खेळाचा ठसा उमटविला आहे. सिंगल स्पॉट, फाईव्ह स्पॉट, मिक्स स्पॉट आदी विविध स्पर्धांमध्ये त्याने अनेक मेडल पटकावली आहेत. जिल्हास्तरीय विविध स्पर्धांत १० गोल्ड मेडल जिंकली आहेत. २०१५ साली पाँडेचरीमध्ये आयोजित नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत ६५० स्पर्धकांमध्ये आर्यनने चमकदार कामगिरी करीत सुवर्ण पदक पटकावले. त्याआधी त्याने मुंबई मेयर स्पर्धेत विविध गटातून ५ रौप्य पदकांची कमाई केली आहे. सोलापूर, कोल्हापूर येथे २०१४ मध्ये राज्यस्तरीत आर्चरी स्पर्धेतही आर्यनने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. मुंबई येथे २०१६ मध्ये आयोजित स्पर्धेतही आर्यनने विविध गटातून ५ रौप्य पदके पटकाविली आहेत. वर्ल्ड फिल्ड असोसिएशनचे सेक्रेटरी सुभाषचंद्र नायर आणि प्रशिक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आर्यनचा सराव सुरु आहे. मुंबईतील प्रबोधन जिमखान्यात आर्यनचा मागील तीन वर्षांपासून कसून सराव सुरु आहे. जिल्हा, राज्य आणि नॅशनल स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य पदकांची लयलूट करणाऱ्या आर्यनची आस्ट्रेलियातील वॉगा - वॉगा येथे २५-३० सप्टेंबर २०१६ दरम्यान वर्ल्ड फिल्ड आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली होती. सातासमुद्रापार आयोजित स्पर्धेत १८ देशातील ५५० स्पर्धक सहभागी झाले होते. कुमार गटासाठी आयोजित या स्पर्धेसाठी भारतातून आर्यन पाटील (उरण) आणि सौरभ मोरे (रोहा - रायगड) या दोन स्पर्धकांची निवड झाली होती. आर्यनवर त्याच्या असंख्य चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. वयाच्या अवघ्या पंधरा वर्षात आर्चरीत चमकदार कामगिरी करणाऱ्या आर्यन पाटील याला आतापासूनच आगामी आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचे देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी त्याने सुभाषचंद्र नायर आणि प्रशिक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शन आणि प्रशिक्षकांच्या मदतीने आतापासूनच जोरदार सरावाची सुरुवात केली आहे. पुढील वर्षात मार्च २०१७ मध्ये अंडर १९ वर्षीय वयोगटात रुमानियात आर्चरी चॅम्पियन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतही आर्यन सहभागी होणार आहे. (वार्ताहर)