शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

धाटाव एमआयडीसीमधील कंपन्यांची मनमानी

By admin | Updated: May 6, 2015 00:58 IST

रायगड जिल्ह्यात कामगार मंत्रालय अंतर्गत जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ कार्यरत आहे. या मंडळामार्फत सर्व आस्थापनांनी सुरक्षा रक्षक नेमणे कायद्याने बंधनकारक आहे.

रोहा : रायगड जिल्ह्यात कामगार मंत्रालय अंतर्गत जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ कार्यरत आहे. या मंडळामार्फत सर्व आस्थापनांनी सुरक्षा रक्षक नेमणे कायद्याने बंधनकारक आहे. असे असताना रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसीमधील अनेक कंपन्या मात्र खाजगी ठेकेदारांकडून परप्रांतीय सुरक्षा रक्षक नेमून स्वत:चा मनमानीपणा करत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी धाटाव एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये काही दिवसापूर्वी रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत स्थानिकांना सुरक्षा रक्षक या पदावर काम करण्यासाठी पाठविण्यात आले होते. परंतु येथील बहुतांशी कंपन्यांच्या व्यवस्थापनाने स्थानिक सुरक्षा रक्षकांना कामावर हजर करून घेतले नाही. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक कायदा १९८१ नुसार मंडळामार्फ त सर्व आस्थापनांना सुरक्षा रक्षक नेमणे बंधनकारक आहे. मंडळामार्फत नेमण्यात येणाऱ्या सुरक्षा रक्षकांना सर्व सोयीसुविधा, पगार, भत्ते देणे आस्थापनांना बंधनकारक आहे. यामुळे धाटाव एमआयडीसीतील अनेक कंपन्या रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत येणाऱ्या सुरक्षा रक्षकांना कामावर हजर करून घेत नाहीत. खाजगी कंत्राटदारांमार्फत सुरक्षा रक्षक नेमताना येथील कंपन्यांकडून स्थानिकांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्यात येते. यापूर्वी रोहा येथील अ‍ॅथनिया कंपनीमध्ये स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना कामावर ठेवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. (वार्ताहर)