शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
4
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
5
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
6
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
7
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
8
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
9
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
10
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
11
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
12
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
13
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
14
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
15
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
16
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
17
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
18
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
19
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
20
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग

निनावी पत्राने भूमाफियांचे मनसुबे मिळणार धुळीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 06:27 IST

निनावी तक्रार अर्जाने खळबळ; कर्जतमध्ये बोगस मालक उभे करून करोडोंच्या व्यवहाराचा घाट?

अलिबाग : रायगड जिल्ह्यात विविध प्रस्तावित प्रकल्पांमुळे जमिनींचे दर हे आकाशाला भिडले आहेत. याचाच फायदा काही भूमाफिया बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन हजारो हेक्टर जमिनी गिळंकृत करण्याच्या तयारीत आहेत. सरकार आणि प्रशासनाने अशा बोगस व्यवहारांची नोंद न करण्याबाबतचे एक निनावी पत्र ६ ऑगस्टला रायगडच्या जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. कर्जत तालुक्यातील २०० गुंठे जमिनीच्या व्यवहारावर प्रकाश टाकणारा उल्लेख या पत्रामध्ये केला आहे. जिल्हा प्रशासनाने पत्राची दखल घेतली आहे.कर्जत तालुक्यातील ममदारपूर या गावातील २०० गुंठे जमिनीचे मालक हे परदेशात राहतात. याच जमिनीचे बोगस मालक उभे करून तीच जमीन कंपन्यांना कोट्यवधी रुपयांना विकण्याचा प्रयत्न काही भूमाफियांनी सुरू केला आहे. या जमिनीचे मालक हे बरीच वर्षे जमिनीकडे फिरकलेच नाहीत. त्याचा गैरफायदा घेण्यात येत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रार निनावी असली तरी तक्रारीमधील जमिनीचे वर्णन आणि परदेशी वास्तव्यास असणाऱ्या मालकांची नावे ही सरकारच्या ऑनलाइनवरील माहितीशी जुळत असल्याने प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रकरणात सरकारने दुय्यम निबंधक कर्जत यांना अशा प्रकारचा जमीन व्यवहार नोंदण्यासाठी आल्यास खºया मालकांची ओळख पटवूनच त्याची नोंद करावी अशी मागणी तक्रारीमध्ये करण्यात आली आहे.मयत व्यक्ती, राज्याबाहेर किंवा परदेशात राहत असलेल्या व्यक्तींचे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तयार करून जमिनींची विक्री करून खरेदीखत नोंदविणाऱ्या टोळीतील सात आरोपींना रायगडच्या पोलिसांनी गजाआड केले होते. आरोपींकडून दहा लाख ५० हजार रुपयांच्या रकमेसह गुन्ह्यासाठी वापरलेली यंत्रसामग्रीही जप्त केली होती. गुन्ह्यातील अन्य पाच जण फरार आहेत तसेच अलिबाग तालुक्यामधील करूळ येथील तर सरकारी जमीन दहा कोटींना विकल्याप्रकरणी एका उद्योगपतीला मुंबई पोलिसांनी अटक केल्याचे उदाहरण देखील ताजेच आहे.बोगस व्यवहारांना काही भ्रष्ट महसूल अधिकारी आणि पोलीस अधिकारी पाठीशी घालत असल्याने त्यांच्या संगनमताशिवाय हे शक्य होणार नाही, तसेच हे भूमाफिया गुंड प्रवृत्तीचे असल्याने थेट तक्रार करण्यासाठी कोणीच पुढे येणार नसल्याचेही अर्जात नमूद केले आहे. प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.निनावी पत्राची जिल्हा प्रशासनाने घेतली दखलकर्जत तालुक्यातील ममदारपूर येथील सुमारे २०० गुंठे जमिनीबाबत बोगस व्यवहार होण्याची शक्यता असल्याने याबाबत तातडीने चौकशी करून तसेच अभिलेखात पडताळणी करून अहवाल सादर करण्याचे लेखी निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी तसेच कर्जतचे तहसीलदार यांना दिले आहेत. त्यामुळे बोगस व्यवहारांना आळा बसण्यास मदत मिळणार आहे.गुन्ह्याची पद्धतसराईत भूमाफिया प्रथम सखोल माहिती मिळवून सर्व प्रथम त्या जागांचे सातबारा उतारे, अन्य महसुली उतारे प्राप्त करतात. त्यानंतर तोतया व्यक्ती उभ्या करून सर्व प्रथम त्यांची त्याच नावांची बनावट आधार कार्ड तयार करून घेतात. त्या बनावट आधार कार्डच्या आधारे बनावट नावे असणारी पॅन कार्ड तयार करून घेतली जातात. त्यानंतर त्यांच्या नावावर असणारी जागा खरेदीखत नोंदवून विक्री केली जाते. तसेच या व्यवहारात मिळालेल्या रकमेचे चेक वटविण्याकरिता बनावट बँक खाती उघडून त्याद्वारे रोख रक्कम काढून घेतली जाते. काही कालावधीनंतर जागा खरेदी केलेल्या व्यक्तीला या व्यवहारात फसवणूक केल्याचे लक्षात येते. रायगड जिल्हा हा पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर मुंबई-पुणे या मोठ्या शहरांसाठी जवळचा असल्याने येथील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे फसवणुकीच्या घटना घडत आहेत. जमीन खरेदी-विक्री करण्यापूर्वी खात्री करूनच निर्णय घेतला पाहिजे, असा सूर उमटत आहे.