शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यातील गारगावच्या हद्दीत आढळले पुरातन बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 00:11 IST

मंदिर किंवा राजवाड्याचे अवशेष असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे

वसंत भोईर

वाडा : तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या गारगाव या गावातील हद्दीत खोदकाम करताना पुरातन बांधकाम आढळले असून, हे बांधकाम मंदिर किंवा राजवाड्याचे असावे, असा अंदाज ग्रामस्थांनी वर्तविला आहे. यापूर्वीही येथे कबर, गुहेचे बांधकाम आढळले होते. पुरातत्व विभागाने या भागाची पाहणी करून हे नक्की बांधकाम कसले आहे, याची खातरजमा करावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

गाळाचा पाडा गारगाव गावातील वाळकू शिद हे आपल्या शेतीत खोदकाम करताना रविवारी त्यांना दगडी बांधकाम आढळून आले. दगडी पाया किंवा कबर असे या बांधकामाचे स्वरूप आहे. या बांधकामापासून जवळच रामेश्वर शिवमंदिर याच भागात आहे. शिवमंदिरात दोन शिवलिंगे आहेत. मंदिराच्या पूर्वेला टेकडीवर गणपतीचे पुरातन मंदिर असून, त्याजवळ हनुमान पुत्र मकरध्वज याची मूर्ती आहे. गारगाव गावात पूर्वी जव्हारचे राजे हवापालट करण्यासाठी आपल्या हत्ती घोडे अशा फौजफाट्यासह वाडा येथे येत असत. त्यांनी वाडा शहरात व आजूबाजूच्या गावात अनेक तळी खोदली होती. वाड्याहून एक गुहा (बोगदा) थेट जव्हारच्या राजवाड्यात काढला होता असे इतिहासात नोंदी असल्याचे वयोवृद्ध नागरिक सांगतात.

जव्हार संस्थानाची मलवाडा ही उपशाखामलवाडा हे गारगाव याला लागूनच असल्याने पूर्वी राजांनी विश्रांतीसाठी या परिसरात छोटे महाल बांधले असावेत. त्याचेच हे अवशेष असावेत, असा एक अंदाज ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. पूर्वी राजे राजवाडे असताना हे संस्थानात गाव असावे. याच टेकडीवर घरांचे अनेक उंचवटे आहेत. तीन ठिकाणी पडक्या महालाच्या खुणा आहेत. विटांचे ढिगारे असून, या विटा चौकोनी पातळ व मजबूत होत्या असे येथील ग्रामस्थांनी सांगितले, तर दुसरीकडे गणेश मंदिर, मगरध्वज मंदिर यांची पडकी मंदिरे आहेत, तर गावदेवी जरीमरी मंदिर आहे.

गारगावला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मलवाडा ही राजांची उपशाखा होती. त्यावेळी राजांनी छोटे महाल बांधले असावेत. तसेच येथे रामेश्वर हे शिवमंदिर असून, आणखी मंदिरे असावीत व हे त्याचे अवशेष असावेत.                             - हरिश्चंद्र पाटील, ग्रामस्थ,गारगांव

टॅग्स :Raigadरायगड