शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

नढाळ तलाव बुजविणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: March 21, 2016 01:37 IST

राज्यात भीषण पाणीटंचाई असताना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील नढाळ गावाच्या हद्दीतील तलाव बुजविण्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला

खालापूर : राज्यात भीषण पाणीटंचाई असताना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील नढाळ गावाच्या हद्दीतील तलाव बुजविण्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला असताना ग्रामपंचायत लोधिवलीतील सर्व सदस्यांनी हा धक्कादायक प्रकार नुकताच चव्हाट्यावर आणला आहे. मुंबईतील धनिकांकडून तलावाच्या क्षेत्रात दगडमातीचा भराव टाकण्याचे काम सुरू होते. यासाठी महसूल विभागाची परवानगी न घेतल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर याची दखल घेत तहसीलदार अजित नैराळे यांनी या अनधिकृत उत्खनन करून भराव करणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. या प्रकरणी तब्बल ८७ लाखांच्या वर दंड ठोठावण्यात आला आहे . चौकजवळील लोधिवली ग्रामपंचायत हद्दीतील असणारा हा पाझर तलावात मातीचा भराव टाकण्याचे काम ग्रामपंचायतीने हाणून पाडले असून, जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असणाऱ्या या तलावात अनधिकृत काम करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी होत असताना कर्जत लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची चौकशी महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली असून, त्याचा सविस्तर अहवाल कर्जत लघु पाटबंधारे विभागाकडे मागविण्यात आला आहे. कर्जत, खालापूर या भागात मुंबईतील धनिकांची फार्महाऊस मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातच जमिनींना सोन्याचा भाव आल्याने स्थानिक दलालांना हाताशी धरून मोक्याच्या आणि जलसाठ्यालगतच्या जमिनी ताब्यात घेण्याच्या घटना घडत आहेत.खालापूर तालुक्याच्या लोधिवली ग्रामपंचायतीच्या नढाळ गावाच्या हद्दीत जवळपास ४० एकरांचा नढाळ पाझर तलाव आहे. अलीकडे या तलावाच्या मजबुतीकरणासाठी जिल्हा परिषदेने कोट्यवधी रुपये खर्च केले असून, या तलावाच्या मागील बाजूस तलावालगत मुंबईतील धनिकांनी तलावात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव केला आहे . गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दगड मातीचा भराव केल्याने तलावाचे पाणी साठवणुकीचे क्षेत्र अंदाजे ४ एकर कमी करण्यात आले आहे. लोधिवली ग्रामपंचायतीने याबाबत तक्रार तहसीलदारांकडे केल्यानंतर तातडीने चौक मंडळ अधिकारी म्हात्रे, तलाठी संजय जांभळे आदी कार्मचाऱ्यांनी सुरू असलेल्या भरावा ठिकाणची स्थळाची पाहणी करून मोजमापे घेऊन त्याच्या छायाचित्रांसह अहवाल सुपुर्द केला. यावेळी सर्व्हे नंबर ८१/१ सह उर्वरित जागेत ३०४४ ब्रास इतका अनधिकृत उत्खनन करून भाराव केल्याचे निदर्शनात आल्याने मुंबईतील धनिक तुषार दिनेश मोतीवाला यांना ८७ लाख ९७ हजार ८०० इतका दंड आकारण्यात आला असून, तशी नोटीस त्यांना देण्यात आली आहे. (वार्ताहर)