शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप

By admin | Updated: February 27, 2016 01:19 IST

तालुक्यातील पोयनाड येथील मयूरेश अजित गंभीर याला सचिन सुरेश तावडे यांचा खून केल्याप्रकरणी अलिबाग येथील जिल्हा न्यायालयातील प्रमुख सत्र न्यायाधीश एस. एम. मोडक

अलिबाग : तालुक्यातील पोयनाड येथील मयूरेश अजित गंभीर याला सचिन सुरेश तावडे यांचा खून केल्याप्रकरणी अलिबाग येथील जिल्हा न्यायालयातील प्रमुख सत्र न्यायाधीश एस. एम. मोडक यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.१३ आॅगस्ट २००७ ला मृत सचिन तावडे हा नेहमीप्रमाणे सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास पोयनाडमधीलच एका पतपेढीत कामाला जाऊन सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घरी परत आला. त्यावेळी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मयूरेश अजित गंभीर हा पल्सर मोटारसायकलवरून सचिनच्या घराजवळ आला व त्याचे वडील सुरेश तावडे यांना सचिन आहे का, असे विचारले. त्यावेळी वडिलांनी सचिन यास तुला कोणीतरी विचारत आहे, असे सांगितले. त्यावेळी सचिन घरातून बाहेर आला असता, आरोपी क्र. २ मयूरेश गंभीर याने त्याच्याजवळील पिस्तुलाने सचिन यांच्या अंगावर गोळी झाडली. त्यामुळे सचिन खाली पडला व त्याचा मृत्यू झाला.या मारहाणीच्या घटनेनंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली. या खटल्याची सुनावणी अलिबाग येथील प्रमुख सत्र न्यायाधीश एस. एम. मोडक यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे माजी अति. शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. एन.जी. ठाकूर यांनी खटल्याचे कामकाज चालवून एकूण १९ साक्षीदारांचे पुरावे नोंदविले होते.या खटल्याचा युक्तिवाद अति. शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. जितेंद्र द. म्हात्रे यांनी प्रभावीपणे केला. युक्तिवाद करताना त्यांनी न्यायालयात सुप्रीम कोर्टाचे एकूण १५ महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय दाखल केले. रणजित कांतीलाल जैन व गणेश हिराजी देवरुखकर या दोघांना पुरेशा पुराव्यांअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. (विशेष प्रतिनिधी)पूर्वीच्या भांडणाचा रागखुनाच्या गुन्ह्यातील आरोपी क्र.१ रणजीत जैन यांचे व सचिन तावडे यांचे घटनेच्या पूर्वी भांडण झाले होते व सचिन याने त्यास मारहाणदेखील केली होती. तेव्हापासून आरोपी क्र. १ च्या मनात सचिनविरुद्ध राग होता. त्यामुळे आरोपी रणजीत जैन याने पूर्वीच्या भांडणाचा रोष मनात धरून त्याचा मित्र आरोपी क्र. २ मयूरेश अजित गंभीर व आरोपी क्र. ३ गणेश हिराजी देवरुखकर यांच्याशी संगनमत करून सचिन सुरेश तावडे यास मारण्यास सांगितले.