शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

रोह्यात नायब तहसीलदारांच्या निलंबनानंतर फक्त खाते चौकशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 01:50 IST

दिव सरकारी पड जमीन विक्री प्रकरण : अद्याप पोलिसांत एफआयआर नाही; तालुक्यात चर्चा

मिलिंद अष्टीवकर 

रोहा : रोहा तालुक्यातील दिव गावातील शासकीय जमीन घोटाळ्या प्रकरणी नायब तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई झाली असून फक्त खाते चौकशी सुरू असल्याचे समजते आहे. ३५० एकर इतक्या मोठ्या स्वरूपाचा गैरव्यवहार उघड होऊन अनेक दिवस झाले तरी अद्याप पोलिसांत साधी एफआयआर दाखल करण्यात आलेली नसल्याचे तालुक्यात याबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले. सामाजिक कार्यकर्ते उस्मान रोहेकर यांनी पत्रक प्रसिद्धीस देऊन या कारवाई विषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तर या प्रकरणातील इतर अधिकारी, दलाल आणि खरेदीदार यांच्यावर कधी कारवाई होणार याकडे रोहेकरांचे लक्ष लागले आहे.

रोहा तालुक्यातील दिव गावातील ३५० एकर शासकीय पड जमीन संगनमताने विक्री प्रकरणाविरोधात शिवसेनेचे विभागप्रमुख उद्देश वाडकर व सर्वहारा जन आंदोलनाने तक्रार करीत आवाज उठविला होता. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणी रोहा नायब तहसीलदार सिराज तुळवे यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, प्रकरणातील महत्त्वाचे सूत्रधार असलेले अधिकारी, दलाल, खरेदीदार आदी लोक अद्याप मोकाट असून त्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई झालेली नाही. रोहा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते उस्मान रोहेकर यांनी या प्रकरणी एक पत्र प्रसिद्धीस दिले असून त्यामध्ये या गैरव्यवहाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामध्ये एकटा नायब तहसीलदार ३५० एकर सरकारी जमिनीचा गैरव्यवहार करू शकतो का?, अनेकांचे हात अडकले असल्याने चौकशी धिम्या गतीने सुरू आहे. जमिनी अधिग्रहण अधिसूचना निघाली त्यापासूनच हा सर्व व्यवहार संशयास्पद आहे. प्रकल्प दिव भागात नियोजित असताना आणि लगत गावांत मुबलक जमीन उपलब्ध असताना, दिवपासून दूरवर ५० कि.मी. अंतरावर सुतारवाडी लगतची दोन गावे या प्रकल्पांतर्गत निर्देशित केली गेली.सुतारवाडी कोणाचे गाव, लगतच्या गावांत कोणी बेनामी जमिनी घेतल्या आहेत याची चौकशी झाली पाहिजे. त्याबरोबर जमीन अधिसूचना प्रसिद्ध होण्याच्या ६-८ महिने अगोदर दिव विभागात इतके जमीन व्यवहार कसे झाले? दिव भागात कोणाचे एजंट-दलाल जमिनी खरेदीसाठी फिरत होते? माणगाव आणि चणेरा विभागातील दलालांना कोणी दिव परिसरात जमीन खरेदीसाठी पाठविले? हा प्रश्न रोहा तालुक्यात विचारून पाहा, उत्तर कोणीही सामान्य माणूस देईल, असे रोहेकर यांनी म्हटले आहे.अडचणीत सापडलेल्या या दलालांकडून आता भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे नाव घेतले जात आहे. या व्यवहारात पडद्यामागील सूत्रधार कोण आहे ते सत्य बाहेर यावे, म्हणूनच कारवाई धिम्या गतीने सुरूआहे. याबाबत खरेदीदार आणि साक्षीदार यांच्यावर पोलीस कारवाई झाल्यास सत्य बाहेर येईल. ते येऊ नये म्हणून केवळ खाते चौकशीचे सोपस्कार सुरू असल्याचे रोहेकर यांनी सांगितले आहे. या प्रकरणी रोहा पोलिसांत चौकशी केली असता कुठलीही एफ.आय.आर. अद्याप दाखल झाली नसल्याचेपी. एस. म्हात्रे यांनी सांगितले.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिव सरकारी जमीन घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने या प्रकरणी एफ.आय.आर. दाखल करावे. तसेच हे प्रकरण ए.सी.बी.कडे चौकशीसाठी द्यावे, अशी आमची मागणी आहे. त्यातून शासकीय, राजकीय, दलाल, साक्षीदार, खरेदीदार आदी अनेक नावे समोर येणार आहेत.- नितीन परब, अध्यक्ष,रोहा तालुका सिटिझन्स फोरम.रोहे तालुक्यातील दिव येथील सरकारी पड जमीन विक्री प्रकरणी नायब तहसीलदारांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. चौकशीमधून काय बाहेर येते, त्यानंतरच पुढील करावाई करण्यात येईल.- पद्मश्री बैनाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड 

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग