शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमधल्या भीरामध्ये 46.5 अंश सेल्सियस तापमान

By admin | Updated: March 29, 2017 16:07 IST

रायगडमधल्या भीरामध्ये 46.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

ऑनलाइन लोकमतरायगड, दि. 29 - गेल्या काही दिवसांपासून तापमान कमालीचं वाढलं असून, रायगडमधल्या भीरामध्ये 46.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईपासून 135 किलोमीटर अंतरावर भीरा हे छोटंसं गाव आहे. भीरा येथे हायड्रो-इलेक्ट्रिक प्लँट आहे. भीराच्या खोलाखाल सोलापूर आणि जळगावमध्ये तापमान नोंदवलं गेलं आहे. भीरामध्ये बुधवारी 46.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्यानं दिली आहे. तर सोमवार आणि मंगळवारी सोलापूर आणि जळगावमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. भीरामध्ये टाटा पॉवर कंपनींचा तिसरा जलविद्युतनिर्मिती प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाची स्थापना 1927ला झाली आहे. भीरा धरण हेसुद्धा टाटा पॉवरहाऊस धरणाच्या नावाने ओळखलं जातं. मुंबईकरांच्या वीकेंडसाठी हे आवडतं ठिकाण आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता. मालेगाव, सोलापूर, जळगाव येथे गेल्या   काही दिवसांपासून तापमान 40 अंश सेल्सियसच्या वर जात होते. मंगळवारी नाशिक, सातारा ही तुलनेने थंड असलेल्या ठिकाणांवरही सर्वाधिक तापमान नोंदलं गेलं आहे. मात्र महाराष्ट्रात उष्णतेच्या लहरी नसल्याचं निर्वाळा देत हवेतील उष्णतेमुळे भीरामध्ये एवढं तापमान नोंदवण्यात आल्याची माहितीही भारतीय हवामान खात्याचे व्ही. के. राजीव यांनी दिली आहे. तसेच येत्या काही दिवसांत तापमानात अशीच वाढ राहणार असल्याचंही भारतीय हवामान खात्यानं सांगितलं आहे.