शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांची १५० कुटुंबे वाऱ्यावर

By admin | Updated: November 30, 2015 02:26 IST

नवी मुंबई येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामध्ये पनवेल तालुक्यातील दगडखाण कामगारांचा संसार उद्ध्वस्त होणार आहे.

आविष्कार देसाई, अलिबागनवी मुंबई येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामध्ये पनवेल तालुक्यातील दगडखाण कामगारांचा संसार उद्ध्वस्त होणार आहे. गेल्या ३० वर्षांपासून त्यांची सरकार दरबारी सातबारा उताऱ्यावर नोंदच घेतली गेली नाही. त्यामुळे तेथील सुमारे १५० कुटुंबे पुनर्वसनापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. हक्कासाठी संघटित होऊन त्यांनी आता वज्रमूठ आवळली आहे. पनवेल तालुक्यातील सिध्दार्थ नगर, गणेशपुरी उलवे येथे गेल्या तीस वर्षांपासून राहणाऱ्या बहुजन समाजातील भूमिहीन कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी सातबारा उताऱ्यावर तत्काळ नोंदी कराव्यात, अशी मागणी आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी आणि सिध्दार्थ नगर गणेशपुरी रहिवासी संघटनेने रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. भूमिहीन मजुरांना न्याय न मिळाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी दिला आहे. १९७० मध्ये सिडकोने जमिनीच्या संपादनाचे काम सुरू केले. त्यावेळी अनेकदा महसुली दप्तरी नोंदी घेण्याचे काम प्रशासनाकडून झाले नाही. तेथील घरे, बांधकामे अनधिकृत ठरविण्यात आली. आता जी कुटुंबे मुख्य गावठाण अथवा सातबारा नोंदी असलेल्या मालकी क्षेत्रामध्ये राहतात, त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र दगडखाण, बिगारी, इमारतीच्या बांधकामाचे मजूर, अशी कामे करणाऱ्या सुमारे १५० स्थलांतरित कुटुंबांच्या नोंदी घेण्याचे काम महसूल प्रशासनाला जमलेले नसल्याची माहिती राजाराम पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्यामुळे विमानतळ प्रकल्पग्रस्त म्हणून सातबारा नोंदी होण्याची गरज असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. गेल्या ३० वर्षांपासून येथे राहणाऱ्या काही कुटुंबांकडे रेशनकार्ड, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र आहे मात्र राहत्या ठिकाणी रस्ते, पाणी आणि वीज नाही. आरोग्याच्या सुविधांची वानवा तेथे आहे. नवी मुंबई शहरासाठी दगडखाणीत काम करणारे हे खरे या शहराचे निर्माते आहेत. प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला देऊन त्यांच्या व्यवसायाचे होणारे नुकसान भरुन द्यावे, त्यांना प्रकल्पात सामावून घ्यावे आणि त्यांना साडेबावीस टक्के भूखंड द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.