शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

पेणमधील ११६ गावे चकाचक

By admin | Updated: January 25, 2016 01:24 IST

भारत स्वच्छ अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र स्वच्छ अभियानाअंतर्गत श्री सदस्यांच्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहिमेचा

पेण : भारत स्वच्छ अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र स्वच्छ अभियानाअंतर्गत श्री सदस्यांच्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहिमेचा दुसरा टप्पा रविवारी पार पडला. पेणच्या २७ ग्रामपंचायतीच्या कार्यकक्षेतील ११६ गावे व वाड्यांवर पहाटे ६ वाजल्यापासून श्री सदस्यांनी हातात स्वच्छतेसंबंधीची अवजारे, झाडू, विळे व प्लास्टिक गोणी घेऊन गावे स्वच्छ करण्यास सुरुवात केली. गटागटाने एकवटून गावच्या वेशी, परिसर, मंदिराचे आवार, मुख्य रस्ते, शाळा, ग्रामपंचायत कार्यालयीन परिसर झाडून, कचरा गोळा करून प्रतिष्ठानने दिलेली जबाबदारी पार पाडत तब्बल पाच तास स्वच्छता केली.२६ जानेवारीच्या ध्वजारोहणाप्रसंगी जो कचरा व जी स्वच्छता ग्रामपंचायतींना करावी लागत होती, ते महत्त्वपूर्ण काम पेणमध्ये तीन हजार श्री सदस्यांनी केले. स्वच्छता अभियान हा राष्ट्रीय कार्यक्रम असल्याने राष्ट्रहिताची भावना व जबाबदार नागरिकांचे कर्तव्य पार पाडून श्री सदस्यांनी गावोगावचे कचऱ्याची ढीग दूर करून ते जाळण्यात आले.डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा हा उपक्रम यापूर्वी नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात राबविला होता. त्यामुळे नगरच्या कार्यकक्षेत श्री सदस्यांची मोहीम दृष्टिपथात होती. दुसऱ्या टप्प्यातील हा उपक्रम ग्रामपंचायती व महसुली गावांच्या हद्दीत असल्याने दूरदूरच्या अंतरावरील कार्यक्षेत्र असल्याने श्री सदस्यांच्या बैठकांच्या सदस्यांना आपल्या जवळील गावाची स्वच्छता करण्याचे नीटनिटके नियोजन व वेळापत्रक दिल्याने पहाटे ५ वाजता श्री सदस्यांनी आपापले साहित्य घेऊनच घराबाहेर पडले. दिलेल्या ठिकाणावर वेळेअगोदर पोहोचून परमेश्वराचे नामस्मरण व मनाचे श्लोक उच्चारत अनेक सदस्य गावागावात स्वच्छता करीत होते. (वार्ताहर)